दैनिक चालु वार्ता कारंजा लाड प्रतिनीधी -अशोकराव उपाध्ये
कारंजा लाड: यवतमाळ तथा वाशिम येथे माध्यमीक शिक्षणाधीकारी पदावर कार्य केलेले व्ही . पी . पाटील यांना जागतीक आंबेडकरवादी साहीत्य महामंडळ नागपूरचे वतीने दि ३० मार्च २०२५ रोजी त्यांच्या शब्द शब्द बुद्ध या कवीता संग्रहास डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्य स्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे पत्र संस्था अध्यक्ष दिपक कुमार खोब्रागडे यांनी दिले आहे .
डॉ राजेश गायकवाड सदस्य महाराष्ट्र राज्य साहीत्य व सांस्कृतीक मंडळ मुंबई यांचे हस्ते संस्थेच्या अकराव्या वर्धापणा दिनी त्यांना पुरस्कार प्रदान होनार आहे . व्ही पी पाटील यांना यापूर्वी बुद्धाची उजेडवाट या ग्रंथास राष्ट्रीय सम्यकत्व पुरस्कार प्राप्त झाला होता . नव्या पुढीला प्रेरणा देणारे त्यांचे लेखन असून विवीध माध्यमाद्वारे त्यांचे लेख व कवीता प्रसीद्ध झाल्या आहेत . शिक्षणाधीकारी पदावर त्यांचे कार्य चांगले होते. यवतमाळ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका या संस्थेने ते संचालक असून दि बुद्धिस्ट पेंशनर्स असोसिएशन संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून रहालेले आहे सदर पुरस्कार जाहीर झाल्याने चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .
