पुणे : संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुण्यामध्ये आली त्यासोबतच हजारो वारकरी व भाविकांचे पुण्यात आगमन झाले. त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात वारकरी मंडळाची पुण्यामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळाली व आता माऊलीची पालखी ही आज ( दि 20 ) उद्या ( दि 21 ) पुणे येथील भवानी पेठ मध्ये थांबते त्यानंतर रविवारी सकाळी सकाळी माऊलीची पालखी ही पंढरीच्या दिशेने वाटचाल करते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी हे माऊली विठ्ठल नामाचा गजर करत आपले वाटचाल करत असतात त्यामध्येच दैनिक चालु वार्ताच्या वतीने वारीमध्ये समाविष्ट झालेल्या वारकऱ्यांसाठी एक छोटासा अल्पोपहारचीं व्यवस्था करण्यात आलेली होती.
त्यामध्ये दैनिक चालू वार्ता व त्यांच्या टीमकडून शेकडो वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले आहे.
वारकऱ्यांना अल्पोपहारचें वाटप करत असताना दैनिक चालु वार्ता व स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांचे सर्वेसर्वा श्री डि.एस लोखंडे पाटील सर यांचे छोटे बंधू श्री रामेश्वर लोखंडे पाटील सर, गजानन कदम सर, साक्षी मॅडम, अंजली मॅडम, श्वेता मॅडम व ऑफिस मधील सर्व स्टाफ समाविष्ट होता.
