2026 पासून दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या नियमांना आज सीबीएसईने मान्यता दिली असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी दिली आहे.
मात्र, आता २०२६ पासून हा पर्याय राहणार नाही. CBSE बोर्डाने वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांना एका वर्षात दोन संधी मिळतील, त्यामुळे त्यांच्यावर तणाव कमी होण्याची शक्यता आहे. २०२६ पासून दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या नियमांना सीबीएसईने मान्यता दिली, असं परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी म्हटलं आहे
ते पुढे म्हणाले की, ‘CBSE बोर्डाच्या परीक्षेचा पहिला टप्पा फेब्रुवारी-मार्चमध्ये, तर दुसरा टप्पा मे महिन्यात घेतला जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात बसणे अनिवार्य असेल, तर दुसरा टप्पा हा पर्यायी असेल. वर्षातून दोनदा सीबीएसई दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जातील. पहिल्या टप्प्याचा निकाल एप्रिलमध्ये लागेल तर दुसरा टप्प्याचा निकाल जूनमध्ये लागेल. अंतर्गत मूल्यांकन फक्त एकदाच घेतलं जाईल’, असंही सीबीएसई बोर्डानं सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, CBSE नुसार, वर्षातून दोनदा होणारी इयत्ता १०वीची बोर्ड परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असेल. मात्र, संबंधित विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापन फक्त एकदाच घेतले जाईल. विशेष म्हणजे, दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना एकच परीक्षा केंद्र दिले जाणार आहे. मात्र, या सुविधेसाठी विद्यार्थ्यांना अधिक परीक्षा शुल्क भरावे लागेल.
