म्हणाले; महान लोकांच्या…
तेहरान : इराण आणि इस्रायलमध्ये १२ दिवसांपासून सुरुअसलेला संघर्ष आता निवळला आहे. मात्र तणाव अद्यापही कायम आहे. २४ जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीची घोषणा केली होती.
परंतु इराणने ही युद्धबंदी मानण्यास नकार दिला होता. तसेच इस्रायल आणि इराणमध्ये असा कोणताही करारा झाला नसल्याचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले होते.याच वेळी इराणने भारताचे देखील आभार मानले आहे. इस्रायलसोबतच्या युद्धादरम्यान भारत आणि भारतीय जनतेने दिलेले पाठिंव्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत.
इराणच्या भारतातील दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, इस्रायलशी युद्धादरम्यान भारतातील सर्व महान आणि स्वातंत्र्यप्रेमी लोकांचे इराण आभार मानतो. निवेदनात इराणने इराणी राष्ट्राचा विजय झालेचेही म्हटले आहे. तसेच भारत आणि इराणच्या दृढ संबंधांचाही उल्लेख यामध्ये केला आहे.
इस्रायलसोबतच्या युद्धात इराणने केली विजयाची घोषणा
निवेदनात इराणने म्हटले आहे की, झिओनिस्ट राजवटीवर इराणी राष्ट्राचा विजय झाला आहे. इराणी राष्ट्राच्या विजयानिमित्त आणि अमेरिकेच्या लष्करी आक्रमणाविरोधी भारतातील सर्व महान व्यक्तींचे आणि स्वातंत्र्यप्रेमी लोकांचे मनापान आभार मानतो असे म्हटले आहे.
यामध्ये भारताताली आदरणीय नागरिक, राजकीय पक्ष, संसदेचे सन्मानीय सदस्य, गैर-सरकारी सदस्य, धार्मिक आणि आध्यात्मिक नेते, माध्यमे, सामाजिक कार्यकर्ते सर्व इराणच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले याचा बद्दल सर्वांचे आभार असे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, भारताने लोकांनी आणि संस्थांनी दाखवलेल्या अमूल्य पाठिंब्याबद्दल आम्ही मनापासून कौतूक करतो. दोन्ही देशांमधील दीर्घकालीन सांस्कृतिक, सभ्य आणि मानतवादी संबंधांमधील ही एकता आणखी मजबूत होईल. शांतता, स्थिरता आणि जागतिक न्यायाचे प्रतीक भारत आणि इराणचे संबंध आहेत.
सध्या इराण इस्रायलविरोधी मोठी कारवाई करत आहे. बुधवारी (२५ जून) सकाळी इराणने इस्रायलच्या ३ गुप्तहेरांना फाशीची शिक्षा दिली आहे. तसेच शेकडो लोकांना संशयाच्या आरोपाखाली अटक केली आहे. यामुळे इराण आणि इस्रायलमध्ये तणाव कायम आहे.
