वैयक्तिक मागत नाही; आंदोलनात सहभाग…
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच केली आहे. 29 ऑगस्टपासून आपण आझाद मैदानावर बेमुदत उपोषण मनोज जरांगे करणार आहेत. या आंदोलनात लाखोच्या संख्येने मराठा बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केली आहे.
भाजपचे नेते जरांगेवर टीका करत आहेत. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी जाहीरपणे आपण आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.
चलो मुंबईची घोषणा देत संजय जाधव म्हणाले, जरांगे पाटलांची भूमिका ही समाजासाठी आहे आणि ती स्वागतार्ह आहे. त्या गोष्टीचे खासदार म्हणून मी समर्थन करतो. खासदार म्हणून मी देखील त्यांच्यासोबत आंदोलनात उतरणार आहे.’
कुठलीही अपेक्षा करू नका आणि उत्सुत्फूर्तेपणे जरांगे पाटलांच्या मागे उभे राहा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. जरांगेवर टीका करणाऱ्या लक्ष्मण हाके आणि अॅड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका करतान ते म्हणाले, काही लोकांचे भू भू सुरू आहे. जरांगे पाटलाच्या अंगावर घेत आहेत. पण अरे जरांगे पाटील वैयक्तिक काही मागत आहेत का तुम्हाला? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
सरकार घाबरले…
मनोजदादांनी जवळपास 4 महिन्यांपूर्वी तारीख घोषित केली होती, मात्र निघायचं असताना सरकारच्या माध्यमातून म्हणल्या जात आहे की, आंदोलनाला परवानगी नाही. याचाच अर्थ सरकार घाबरलय, असा टोला देखील संजय जाधव यांनी लगावला.
शरद पवारांच्या आमदाराचा पाठींबा
मनोज जरांगे पाटील यांचा आंतरवाली सराटी येथून मोर्चा निघाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे यांचा सत्कार केला. तसेच आपला जाहीर पाठींबा दिला. मोर्चामध्ये आपण देखील मुंबईला येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्र्यांच्या वतीने शिष्टमंडळ शिवनेरी येथे भेटीला येणार, काल रात्रीच मला फोन आलेला, तरीही, जरांगेंनी मराठा समाजाला केलं मोठं आवाहन.
