दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मंनधरणे
देगलूर तालुक्यात कुठेही बालविवाह होत असल्याचे आढळल्यास आता गय केली जाणार नाही. मुलीचे वय १८ वर्ष आणि मुलाचे २१ वर्ष या कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन जर कोणी बालविवाहाचा घाट घातला, तर संबंधित पालकांसह, लग्न लावणारे, मंगल कार्यालय मालक आणि वन्हाडी मंडळींवर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांची रवानगी थेट तुरुंगात केली जाईल, असा सज्जड दम प्रशासनाने दिला आहे.
बालविवाह हा केवळ सामाजिक शाप नसून तो एक गंभीर अजामीनपात्र गुन्हा आहे बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार वरील बाबी घडल्यास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळल्यास २ वर्षापर्यंत सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते व१ लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. या विवाहाला केवळ आई-वडीलच नव्हे, तर लग्न लावणारे पुरोहित, वाजंत्री, फोटोग्राफर आणि लग्नाला उपस्थित राहणारे पाहुणे यांच्यावरही गुन्हे दाखल होऊ शकतात. बालविवाह हा केवळ कुटुंबाचा प्रश्न नसून सामाजिका प्रश्न आहे. या कुप्रथेचे समुळ उच्चाटन होणे गरजेचे आहे. यासाठी शासनासह सेवाभावी संस्था आणि पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने हे काम होत आहे.
मंगल कार्यालय आणि लॉन मालकांना कडक सूचना
तालुक्यातील सर्व मंगल कार्यालय मालक, लॉन आणि वाजंत्रीवाल्यांना लग्नापूर्वी वधू-वरांच्या वयाचे अधिकृत दाखले (आधार कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला) तपासणे बंधनकारक आहे. विना शहानिशा लग्न लावल्यास संबंधित कार्यालयाचा परवाना रद्द करून मालकावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. शिवाय, शाळा, महाविद्यालयात जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. बालविवाह हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून तो सामाजिक गुन्हा आहे. याबाबत पालकांचा समजावून सांगण्यात येत आहे असे देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी दैनिक चालू आता प्रतिनिधींशी वार्तालाब केला
चौकटीत
आम्ही केवळ विवाह थांबवत नाही, तर विवाह लावणारे पुरोहित, मंगल कार्यालय मालक, छपाई करणारे आणि दोन्ही बाजूंचे पालक यांच्यावरही गुन्हे दाखल करतो. तक्रारीची गुप्तता आणि तत्परता अनेकदा लोक ओळ-खीच्या भीतीपोटी तक्रार करत नाहीत.चाइल्ड हेल्पलाईनः १०९८ पोलीस नियंत्रण कक्षः १०० स्थानिक तहसीलदार किंवा ग्रामसेवक कार्यालय येथे संपर्क साधावा. या वाईट प्रथेचा समुळ उच्चाटनासाठी सर्वांनी प्रयत्न गरजेचे आहे…
मारुती मुंडे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देगलूर
