
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
नव्या राष्ट्रपतींसाठी सध्या पाच नावं ही चर्चेत ; पाचही चर्चेतली नावं ही महिलांची !
नवी दिल्ली : देशात आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणुका घोषित झाल्या आहेत. त्यामुळे येत्या 21 जुलैपर्यंत देशाला नवे राष्ट्रपती मिळणार आहेत हे स्पष्ट झालं आहे.
त्यामुळे सहाजिकच आता देशाच्या सर्वोच्च पदावर कोण विराजमान होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. नव्या राष्ट्रपतींसाठी सध्या पाच नावं ही चर्चेत आहे. ही पाचही चर्चेतली नावं ही महिलांची आहेत. त्यामुळे देशाला दुसऱ्या महिला राष्ट्रपती मिळणार का? असा सवाल अनेकांच्या मनात आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील यांना बहुमान मिळाला होता. आता असाच बहुमान दुसऱ्या महिलेला मिळणार का? हेही पाहणं तितकेच म्हत्वाचं आहे. मात्र आता भाजप कुणाच्या नावासाठी पुढकार घेतं? त्यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे. येत्या काही दिवसांतच हेही चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीची तयारी आता निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.
चर्चेतली नावं कोणती?
यात पहिलं नाव आघाडीवर आहे ते माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचं, मराठमोळ्या सुमित्रा महाजन यांचा जन्म कोकणातील आहे. इंदोरच्या जयंत महाजन यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्यानंतर मध्य प्रदेश हेच त्यांचं कार्यक्षेत्रं बनलं. सुमित्रा महाजन या इंदौरमधून 1989, 1991, 1996, 1998, 1999, 2004, 2009 आणि 2014 रोजी सलग संसदेत निवडून गेल्या, मात्र गेल्या निवडणुकीत त्यांना तिकीट देण्यात आलं नव्हतं. आता महाजन या राष्ट्रपती झाल्यास प्रतिभा पाटील यांच्या नंतरच्या त्या दुसऱ्या मराठी राष्ट्रपती ठरू शकतात.
राष्ट्रपतीपदाच्या यादीत सध्या दुसरं नाव चर्ते आहे ते उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचं, आनंदीबेन पटेल या गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आहेत, तसेच त्या गुजरातच्याही असल्याने त्यांच्या नावाचा मोदी विचार करू शकतात अशा चर्चा आहेत.
राष्ट्रपतीपदासाठी तिसरं नाव चर्ते आहेत ते छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके याचंं, कारण राष्ट्रीय राजकारणात अनुसया उईके यांचाही मोठा राजकीय दबदबा आहे. तसेच आदिवासी महिला म्हणूनही त्यांना हा बहुमान दिला जाऊ शकतो.
राष्ट्रपतीपदासाठी चौथं नाव चर्तेत आहे ते तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांचं, यांची मोठी राजकीय कारकिर्द पाहता त्यांच्याही वर्णी राष्ट्रपतीपदी लागू शकते.
पाचवं नाव या पदासाठी चर्चेत आहे ते झारखंडच्या राज्यपाल द्रोपदी मुर्मू यांचं, देशात आजपर्यंत आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदापर्यंत कधीच संधी मिळाली नाही. त्यामुळे यावेळी ही दोन्ही नावं आघाडीवर आहे.