दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस दलाचे संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.
गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयात गणेशोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्थेविषयी माहिती देण्याकरिता जनतेतर्फे दक्षता घेतली जावी यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
त्या दरम्यान आ. गुट्टे यांनी पोलीस दलावर हप्ते खोरीचा घणाघाती आरोप सार्वजनिक ठिकाणी केल्यामुळे बैठक स्थानी पोलीस दल आणि आ. गुट्टे यांच्यात कमालीची खडाजंगी झाली. या घटनेचे दोन उपस्थितांशी जिल्हाभरातील खेड्यापाड्यातून पसरले जाते स्वाभाविक आहे. परिणामी संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत पोलीस यंत्रणेतर्फे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा घटनांचा तथा आरोपांचा ऊहापोह करण्यापूर्वी आ. गुट्टे यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने तरी तारतम्य बाळगायला हवे होते, अशी चर्चाही जोर धरली जाणे स्वाभाविक आहे. समाज हित आणि प्रशासकीय गोपनीयता यांचे मर्म ओळखूनच लोकप्रतिनिधींनी आरोप केला असता तर पोलिसांना सुध्दा टोकाची भूमिका घेणे भाग पडले नसते असेही काही जणांनी बोलून दाखवले. भविष्यात हा प्रश्न शासन दरबारीही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण राज्याचे गृहखाते भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असून राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार असलेले गुट्टे यांचे भाजपाला समर्थन तर आहेच शिवाय फडणवीस आणि आ. गुट्टे यांच्यातील कमालीचे सख्ख्य हे सुध्दा सर्वश्रुत आहेच. तथापि पोलीस दलावर हप्तेखोरीचा घणाघाती आरोप सार्वजनिक ठिकाणी जर कोणाकडून होत असेल आणि ती व्यक्ती एखादी लोकप्रतिनिधी जरी असली तरी त्या खात्याचे मंत्री म्हणून संरक्षण करण्यापेक्षा गृहमंत्री फडणवीस हे लोकप्रतिनिधींचे समर्थन करतील का, हा खरा चिंतेचा प्रश्न आहे. जर तसे झाले तर मात्र समस्त पोलीस दलाचे पूरते खच्चीकरण करण झाल्याशिवाय राहाणार नाही, हे सुध्दा तितकाच संशोधनाचा भाग राहील. किमानपक्षी पोलीस खात्यांतर्गतचे अंतर्गत संरक्षणाचे गृहमंत्र्यांनी हित जरी नाही बघितले तरी चालेल परंतु एखाद्या लोकप्रतिनिधीला पाठीशी घालून काळ सोकावला जाईल अशी भूमिका जर घेतली तर मात्र भविष्य काळ कठीण राहिल यांचाही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे एवढे नक्की.
