
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाद्रा या ठिकाणी संपन्न झालेल्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये कै.शंकररावजी चव्हाण शिक्षक ज्ञानरत्न पुरस्काराचे वितरण दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाले.लोहा तालुक्यातील अत्युत्कृष्ट कार्य असलेल्या आठ शिक्षकांना गौरवान्वित करण्यात आले.भव्यदिव्य अशा कार्यक्रमात नांदेड दक्षिणचे आमदार श्री मोहन अण्णा हंबर्डे आणि माजी आमदार रोहिदास रावजी चव्हाण,श्रीनिवास मोरे मा.जि.प.सदस्य,गटशिक्षणाधिकारी रविंद्रजी सोनटक्के नगर सेवक संभाजी चव्हाण शिक्षक काँग्रेसचे राज्य कोषाध्यक्ष प्रकाशजी मुंगल यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात आले.
याप्रसंगी माजी जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सरस्वती अंबालवाड, केंद्रप्रमुख श्री मदन नायके केंद्रीय मु.अ.चंपतराव सावळे सर,शिक्षक ,जिल्हा सल्लागार बाबुराव कैलासे ,शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर,सायाळचे सरपंच अन्नाराव पवार पांगरीचे सरपंच भरत कोपनर,ऊपसरपंच माधव पा.बुद्रूक,शा.व्य.स.पांगरी अध्यक्ष भारत पवार,माऊली पवार,भाद्रा शा.व्य.समिती अध्यक्ष अंकुश चिंचोरे ऊपाध्यक्ष मुंजाजी चिंचोरे भाद्रातांड्याचे शा.व्य.समिती अध्यक्ष राजेश पवार,सरपंच प्रतिनिधी शेषराव पा.चिंचोरे,केशव पा.पवार संग्राम पा.चिंचोरे,खंडू पा.पवार,मारोतराव पा.पवार,रेषमाजी चिंचोरे संभाजी पा.पवार,अर्जुन पावार,ऊत्तमराव पवार,भिमराव पा.पवार,श्रीकांत चिंचोरे भगवान पानपत्ते आनेक मान्यवरांच्या व शिक्षण प्रेमी यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला.
हा पुरस्कार तालुक्यातील विविध शाळांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी प्रदान करण्यात येतात. इ.स. 2022 सालचे कै.शंकररावजी चव्हाण ज्ञानरत्न पुरस्कार 1)मा.श्री.बालाजी गंगाराम डफडे ( केंद्रप्रमुख संकुल गोलेगाव ) 2)मा.श्री.बालाजी यशवंतराव चव्हाण ( मु.अ.जि.प.प्रा.शा.धावरीचे ) 3)मा.श्री.ऊमाकांत विश्वनाथ कोंडे ( स.शि.जि.प.प्रा.शा.आडगाव ) 4)मा.श्री विशाल मेघाजी महाबळे ( स.शि.जि.प.प्रा.शाळा निळा )
5)सौ.शैलजा सुभाष वळसे, ( स.शि.जि.प.कें.प्रा.शाळा ब्रँच लोहा ) 6)सौ.सुरेखा सदाशिवराव नरंगले( स.शि.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा ) 7)सौ.सुनिता देविदास केंद्रे ( स.शि.जि.प.हा.आष्टूर ) 8)सौ मनीषा मधुकर बांड ( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळकेवाडी ) 9 )मा.श्री.गोविंद पवार ( पत्रकार युवा पुरस्कार ) 10 )मुंजाजी चिंचोरे ( कोरोणा योध्दा पुरस्कार )11 )श्रीकांत चिंचोरे ( कोरोणा योध्दा )
या कार्यक्रमात आमदार मोहन अण्णा हंबर्डे माजी आमदार रोहिदासरावजी चव्हाण,श्रीनिवासजी मोरे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के,नगर सेवक संभाजी चव्हाण यांच्या हस्ते दिमाखदार कार्यक्रमामध्ये संपन्न करण्यात आले. याप्रसंगी सुनेगाव संकुलातील शिक्षक नेते मुर्तुज शेख सर,शिवराज सोनवळे,संघाचे जिल्हा नेते जी.पी.चव्हाण सर सुनेगाव केंद्रातील सर्व मु.अ. सर्व शिक्षक बंधू भगनी भाद्रा पांगरी आणि भाद्रा तांडा येथील शेकडो शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव बोरगावचे प्र.पदवीधर श्री रमेश पवार यांनी तर प्रास्ताविक या सोहळ्याचे आयोजक महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्री विठुभाऊ चव्हाण यांनी व्यक्त केले.
भाद्रा येथील शिक्षण परिषद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्यपुरस्कार प्राप्त काशिनाथ शिरसीकर सर,जि. प प्राथमिक शाळा पांगरी चे मुख्याध्यापक मारुती बट्टलवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाद्रा तांडा चे मुख्याध्यापक परशुराम मिरेवाड राहुल बनसोडे ज्ञानेश्वर नलबलवार गोंड सर श्रीमंगले मॅडम,शिक्षक काँग्रेसचे ता.अध्यक्ष संभाजी पवार,ज्ञानोबा केंद्रे सर,परमेश्वर तिडके सर,सय्यद शेख सर ऊमाकांत कोंडे सर आदीने परिश्रम घेतले.