दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
सूनेगाव केंद्रांतर्गत जि प प्रा शा भाद्रा ता लोहा येथील शिक्षण परिषदेत शिक्षक काँग्रेस ता लोहा च्या वतीने डॉक्टर शंकरराव चव्हाण ज्ञानरत्न शिक्षक पुरस्कार -2022 शिक्षण ,सामाजिक व सांस्कृतिक इ क्षेत्रात उत्कृष्ट करणाऱ्या एक केंद्रप्रमुख , शिक्षक व शिक्षिका , गुणवंताचा प्रमाणपत्र ,शाल देवून दक्षिण नांदेड चे मा आमदार श्री मोहनअण्णा हंबर्डे, कंधार चे माजी आ. रोहिदासराव चव्हाण ,माजी जि प सदस्य श्री श्रीनिवासराव मोरे , लोहा नगर परिषदे चे नगरसेवक श्री संभाजी पा. पवार ,पं स लोहा चे गटशिक्षणाधिकारी मा रवींद्रजी सोनटक्के,शिक्षण विस्तार अधिकारी सरस्वती अंबलवाड , महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस चे राज्य कोषाध्यक्ष प्रकाश पा मुंगल ,विभागीय अध्यक्ष श्री विठुभाऊ चव्हाण ,पदोन्नत मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा सहकारी शिक्षण पतपेढी नांदेड चे संचालक श्री बाबुराव कैलासे, प्रा शा धावरी चे पदोन्नत मु अ तथा सत्कारमूर्ती श्री बी वाय चव्हाण, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीसंतोषअंबुलगेकर , ग्रामपंचायत कार्यालय सायाळ चे सरपंच आणणाराव पाटील पवार उपसरपंच प्रतिनिधी श्री शेषराव प चिंचोरे शा व्य समिती चे श्री केशव पा पवार ,केंद्रप्रमुख श्री मदन नायके , केंद्रिय मुख्याध्यापक श्रीचंपती सावळे ,अखिल म प्रा शि संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री शेख मुर्तुज ,महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस लोहा ता . अध्यक्ष श्री संभाजी पवार ,शिक्षणप्रेमी तथा प्रगतशील शेतकरी मारोती पाटील पवार इ.च्या उपस्थितीत गोलेगाव केंद्राचे उपक्रमशील केंद्रप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघा चे राज्य उपाध्यक्ष बालाजी गंगाराम डफडे यांच्या कार्याची दखल घेवुन आज त्यांचा शाल ,पुष्पहार व ट्रॉफी देवून नुकताच सत्कार करण्यात आला .
यावेळी सुनेगाव केंद्रातील सर्व मुख्याध्यापक,सर्व शिक्षक शिक्षिका भाद्रा येथील शाळा व्यवस्थापन समिती चे सर्व पदाधिकारी, शिक्षणप्रेमी नागरिक माता-पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
सदरिल कार्यक्रमाचे सुरेख संचलन उपक्रमशिल पदवीधर प्रा. शिक्षक श्री रमेशराव पवार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक श्री काशिनाथ शिरसीकर ,श्री शेख इकबाल उमदुसाहेब श्रीज्ञानोबा नलबलवार , श्री मिरेवाड ,श्री एम डी बटलवार त्यांचे सहकारी सर्व शिक्षक व सूनेगाव केंद्रांतर्गत शिक्षकांनी परिश्रम घेतले .
