
दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी- मन्मथ भुस्से
भारतीय राजकारणातील बदलते प्रवाह हे प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन डॉ.डी. आर. भागवत यांनी केले.ते शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे, राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित अभ्यास मंडळ व भित्तीपत्रक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. के के पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. डी. आर. भागवत, माजी राज्यशास्त्र विभाग प्रमुख सौ.कमलाताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी हे उपस्थित होते. मंचावर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रघुनाथ शेटे , प्रा. माधव टेंभुर्णे ,
डॉ. जे. सी. पठाण यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी राज्यशास्त्र विभागाच्या वतीने भितीपत्रक व अभ्यास मंडळाचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षस्थानी गणेश दुधाटे, उपाध्यक्ष योगेश मोळके, सचिव श्रुती अडकिने, सदस्य अविनाश सूर्यवंशी, चंद्रकांत सूर्यवंशी, रामदास गाडगे, कृष्णा तीळेवाड, वैष्णवी शिनगारे, मनीषा दुधाटे, पारवे पूजा, मंगेश काकडे, सचिन सोळंके, भाग्यश्री साबळे हे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.या प्रसंगी डॉ.भागवत पुढे बोलताना म्हणाले की,भारतात सध्या मोठ्याप्रमाणात राजकीय बदल होत आहेत या राजकीय परिस्थितीचा अभ्यास राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. भारतीय लोकशाही पुढील आव्हाने आज कोणती आहेत हे आपण समजून घेऊन त्या आव्हानाचा मुकाबला करून आपली लोकशाही ही टिकवून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे.
कार्यक्रमाचा समारोप करताना प्राचार्य डॉ.के.के.पाटील म्हणाले की,आज प्रत्येकाला आपल्या देशातील बदलत जाणारे राजकीय क्षेत्र याचा प्रत्येकाने अभ्यास करून मत ठरवले पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रघुनाथ शेटे यांनी केले तर आभार प्रा.माधव टेम्भुरने यांनी मानले.