
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दर्यापूर फाट्याजवळ सीपी पथकाने छापा टाकून शिराज खान नावाच्या आरोपीला अटक केली.तो ७ लाख ७५ हजार रुपये किमतीचा सरकारी रेशनचा ५४० किलो तांदूळ घेऊन चालला होता.पोलीसांकडून ट्रकसह २२ लाख ७५ हजारांचा माल जप्त करून पुढील कार्यवाही वलगाव पोलीस करत आहे.
शिराज खान मेहमूद खान (२५,खोलापूर,भातकुली) अटक करण्यात आलेल्या रेशन तस्कर आरोपीचे नाव आहे.गुप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी दर्यापूर फाटा येथे ट्रक क्रमांक एम एच ४०/बीएल ७१०७ पकडला.ट्रकचालक शिराज खान यांच्याकडून अन्नधान्याबाबत विचारपुस करण्यात आली असता त्याने गोंदियाला माल घेऊन चाललो असल्याचे सांगितले.त्यांनी मालकाबद्दल सांगितले की,भातकुली रहिवासी अमोल सुरेश महल्ले यांचा माल आहे.माल खरेदीबाबत विचारणा केली असता कुठलाही कोड किंवा कागदपत्रे मिळाली नाहीत.तो माल सरकारी आहे की इतर कुठला आहे यासाठी तो तपासणी करीता ट्रक व २२ लाख ७५ हजार रुपयाचा मुद्देमाल पुढील कारवाईसाठी वलगाव पोलीसांच्या ताब्यात घेतला आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंग यांचे विशेष सहाय्यक निरीक्षक योगेश इंगळे,सूरज चव्हाण,राजिक रायलिवाले,निखील गेडाम,सुभाष पाटील,झहीर शेख,रणजित गावंडे,रोशन वऱ्हाडे यांच्या पथकाने केले.