
दैनिक चालू वार्ता परभणी उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखालील जालना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला परभणीचे खासदार संजय जाधव यांची उपस्थिती होती.
जिल्हा विकासासाठी विविध लोकप्रतिनिधींकडून आलेल्या विधायक सूचनांचा गांभिर्याने विचार करून त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे यावेळी पालक मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. त्याशिवाय अन्य काही बाबींवर ही सांगोपांग विचार विमर्श या बैठकीत करण्यात आल्याचे समजते.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे, बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व अन्य सर्व अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.