
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवने..
सुरुवातीपासून पावसाने जोर धरल्यामुळे अतिवृष्टी झाली.आता परतीच्या पावसाने खरीपाच्या पिकाची माती झाली आहे. झालेल्या नुकसानीची राज्य सरकारने दखल घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा. सर्व शेतकरी पुत्रांची वेगवेगळ्या शेतकरी संघटनांची. गुरुवारी(दि.27) या दिवशी शेतातील नुकसान झालेल्या पिकाचे फोटो अपलोड करण्याचे आव्हान ऑनलाईन ट्रेंडच्या माध्यमातुन केले होते.मंठा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतातील नुकसान झालेल्या पिकाचे विदारक फोटो अपलोड करून लक्ष वेधले. सरकारने झालेल्या नुकसानिच्या तातडीने उपाययोजना कराव्यात. या कारणामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी पुत्रांनी ऑनलाईन ओला दुष्काळ ट्रेंडचे आयोजन केले होते.सकाळी 11ते रात्री 11 या वेळेत शोशियल मीडियावर ओला दुष्काळ, पीक विमा अशा अनेक मागण्याचे पोस्टर व पोस्ट मोठ्या प्रमाणात प्रसारित करून जण जागृती करणे. मागण्या माण्य करण्यास भाग पाडणे. असा उद्देश ऑनलाईन ट्रेंडचा होता . यात शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक या सर्वांनी सहभागी होऊन सरकारला सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना प्रति 1एकर 50हजार रु. मदत द्यावी व अग्रीमसह विमा भरपाई द्यावी अशा मागण्या ऑनलाईन ट्रेंडच्या माध्यमातून करण्यात आल्या.