
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत सहाय्यक कार्यकारी अधिकारी व तांत्रिक सहाय्यक लिपिक सह डाटा एन्ट्री ऑपरेटर्सनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यंत पांडा यांना निवेदन दिले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गेल्या १० ते १२ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर वर्षानुवर्षे मग्रारोहयो काम करत आहे असे निवेदनात म्हटले आहे.याशिवाय वरिष्ठांनी दिलेल्या कामाची जबाबदारी पार पाडून कामे वेळेत पूर्ण केली जात आहेत.त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळातही त्यांनी जीवाची पर्वा न करता गावातील अनेक मजुरांना मग्रारोहयो अंतर्गत काम करून त्यांना रोजगार दिला.असे असतानाही गेल्या तीन-चार वर्षांपासून कंत्राटी कामगारांच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही.मानधनात वाढ करण्याच्या मागणीबाबतही अनेकवेळा निवेदने देण्यात आली.मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे आकृतीबंधात समायोजन करण्यात यावे,पश्चिम बंगाल राज्याच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे,योजनेतील सर्व कंत्राटी कामगारांची राज्यात नियुक्ती करण्यात यावी,अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.फंड असोसिएशन ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात आणि मध्य प्रदेश सरकारच्या म्हणण्यानुसार त्यांना वयाच्या ६२ वर्षापर्यंत नोकऱ्या मिळाव्यात.या मागण्यांसाठी १८ जानेवारी रोजी एक दिवसीय संप पाळण्यात आला होता.त्यानंतर असहयोग आणि कलमबंद आंदोलन करण्यात आले.या तत्वावर बुधवार, १ फेब्रुवारीपासून बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे.जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत,तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.अशी माहिती संघटनेच्या अध्यक्षा प्रीती तायडे,अभिजीत काळे,शुभांगी पांडे यांनी दिली आहे.