
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश हाके यांची सलग नवंव्यादा भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी निवड करण्यात आली या निवडीचे पत्र भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते देण्यात आले.
गणेश हाके यांनी भारतीय जनता पक्षाचे काम पक्ष वाढीसाठी अविरतपणे निष्ठेने केले या केलेल्या कामाची पावती म्हणून आज परत नवव्यांदा भाजपाच्या प्रदेश प्रवक्ते पदी निवड भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी आ. रमेश आप्पा कराड व शैलेश लाहोटी हे उपस्थित होते.
या निवडीबद्दल मा.आ. विनायकराव पाटील,मा.आ. बब्रुवान खंडाडे,दिलीपराव देशमुख, भारत चामे, अशोक केंद्रे जि. प.सदस्य, त्र्यंबक गुट्टे ,हनुमंत देवकते ता.अध्यक्ष भाजपा अहमदपूर, शिवाजी बैनगिरे, बबलू पठाण दत्तात्रय जमालपुरे, प्रताप पाटील,परमेश्वर पाटील तसेच अहमदपूर- चाकूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी दादांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.