
दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
कोकण उन्नती मित्र मंडळाचे वसंतराव नाईक कला,वाणिज्य आणि बॅरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयाने कोकण उन्नती मित्र मंडळ मुंबई संस्थेचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले,विश्वस्त सचिव अशोक तळवटकर,स्थानीक विकास समिती प्रतिनिधी सचिव फजल हळदे,सदस्य महादेव पाटील,सदस्या निलम वेटकोळी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय सांस्कृतिक समितीच्या वतीने भारताचे माजी केंद्रीय आरोग्य मंत्री,माजी मुख्यमंत्री कोकण उन्नती मित्र मंडळाचे संस्थापक,कोकणचे भाग्यविधाते स्वर्गीय बॅ.ए.आर.अंतूले यांच्या जीवन कार्यावर अधारित राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निबंधाद्वारे आपले कौशल्य सादरीकरण प्रत्यक्ष,ईमेलद्वारे किंवा टपालाद्वारे दिनांक ९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पाठवावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य दिगंबर टेकळे,स्पर्धा समन्वयक प्रा.कानिफ भोसले यांच्याकडून करण्यात आले आहे.निबंध पाठवण्यासाठी ईमेल-vasantrao.naik@yahoo.com चा वापर करता येईल.निबंध स्पर्धा खालील ६ विषयांवर आधारित असून 1)बॅ.ए.आर.अंतूले यांचे व्यक्तित्व आणि कार्य 2)धर्म निरपेक्ष राजकारण आणि बॅ.ए.आर.अंतूले 3)बॅ.ए.आर.अंतूले यांचे राजकीय कार्य 4)बॅ.ए.आर.अंतूले यांचे सामाजिक कार्य 5)बॅ.ए.आर.अंतूले यांचे शैक्षणिक कार्य 6)बॅ.ए.आर अंतूले यांचे साहित्यिक योगदान असे आहेत.विजेत्यांना अनुक्रमे 10,7,5, आणि 1हजार रूपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे
तरी महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेसाठी निबंध पाठवून सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.