
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा)प्रतिनिधी: विदर्भातील गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठातील सांस्कृतीक भवनाला स्व. दत्ताजी डीडोळकर यांचे नाव देण्याचा सिनेट समितीचा ठराव दुर्दैवी असून तो रद्द करण्यात यावा अशी मागणी आष्टी येथील राणी दुर्गावती आदिवासी बहुउद्देशीय महिला मंडळाने आष्टी तहसीलदार यांच्या मार्फत भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे याबाबत असे की, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मातीशी स्व.दत्ताजी डिडोळकर यांचा कुठलाही संबंध नसताना विद्यापीठातील सांस्कृतिक भवनाला नाव देण्याचा सिनेट कमेटीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून भेदभावपूर्ण आहे त्यामुळे आदिवासी समाजामध्ये संताप निर्माण झाला असून आदिवासी समाजाची अस्मिता आणि आत्मसन्मानाला ठेस पोहोचवणारा स्व. दत्ताजी डीडोळकर यांचे नाव देण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे या उलट १८५७ च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीर शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचे राष्ट्रीय कार्य लक्षात घेवून गोंडवाना विद्यापीठाच्या सांस्कृतिक भवनाला क्रांतिवीर शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचे द्यावे अन्यथा नामांतरासाठी आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनातून राणी दुर्गावती आदिवासी बहुउद्देशीय महिला मंडळांनी केला आहे