
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मारतळा—- जि. प. प्रा. शा. धनजीतांडा येथे शिक्षण परिषद केंद्रप्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक बी.जी. कापसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या शिक्षण परिषदेला सुगाव संकुल अंतर्गत जि.प.व खाजगी शाळा सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांची उपस्थिती होती. उपस्थित सर्व गुरुजनांचे, प्रमुख पाहुण्यांचे शाल पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
सदर शिक्षण परिषदचे प्रास्ताविक बी.आर. वाघमारे मु.अ. धनजीतांडा यांनी केले.
शिक्षण परिषदेस प्रमुख अतिथी म्हणून उमरा ग्रामपंचायत उपसरपंच स्वप्निल मनोहर पाटील,डॉ.बालाजी पवार सरपंच प्रतिनिधी उमरा, अखिल म. शि. संघाचे राज्य अध्यक्ष देविदास बस्वदे, पुरोगामी शिक्षक संघटनाचे राज्य उपाध्यक्ष जी. एस. मंगनाळे , अखिल म.प्रा.शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा नवनिर्वाचित शिक्षक पतपेढी चे संचालक तथा माजी चेअरमन अशोक पाटील मारतळेकर,पं. स. लोहा चे गट समन्वयक रामदास कस्तुरे , बाळू चव्हाण , साईनाथ पवार, दादाराव पवार , सावित्रीबाई पवार, .आदी उपस्थित होते.
एम.डी सिरसाट यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार व तसेच नानासाहेब बच्चेवार यांना राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा संकुलाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
गट समन्वयक कस्तुरे यांनी शिक्षण परिषदेचे उद्दिष्टे या विषयी मार्गदर्शन केले तसेच बाळू चव्हाण यांनी शिक्षण परिषदेचे महत्त्व या विषयी माहिती सांगितली,. कृती आराखडा तयार करणे या विषयी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थी लाभाच्या योजना विषयी बेटकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती विषय व्यंकटपुरवार यांनी मार्गदर्शन केले. सरल अहवाल विषयी मनोहर शितळे यांनी मार्गदर्शन केले.
सदर केंद्रस्तरीय शिक्षण परिषद यशस्वी रित्या पूर्ण करण्यासाठी पंढरी पवार, अंकुश पवार, दर्शना राठोड, बिजूबाई राठोड , सर्व शिक्षक आदींनी परिश्रम घेतले.तसेच सर्वांना स्वादिष्ट भोजनाची सोय केली.
सदर शिक्षण परिषदचे सूत्रसंचलन एस.जी. बेटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन आर.एस. सावळे यांनी केले.