
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
आष्टी(श)(वर्धा)प्रतिनिधी : स्थानिक गौरखेडा भागात आष्टी तलावाच्या कालव्यातील फुटलेल्या भागातून लोकवस्तीत पाणी शिरत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत असल्याबाबतची तक्रार ४ महिन्यांपूर्वी नगरसेवक गौज खा उर्फ पप्पू खान यांनी संबंधित पाटबंधारे विभाग आष्टी कार्यालयात तक्रार दाखल केली होती मात्र ४ महिन्यापासून अजूनही कार्यालयाने कोणतीही ठोस दखल न घेतल्याने त्यापासून वित्त व प्राणहानी होण्याची शक्यता तक्रारीत नमूद आहे प्रसार माध्यमात वृत्त पोहोचल्याचा सुगावा लागताच संबंधितांनी काल,परवा कालव्याची थातूरमातूर डागडुजी करून पाटबंधारे कर्मचाऱ्यांनी देखावा निर्माण केला असे नगरसेवक खान यांनी कळविले आहे मात्र कालव्याची कायमस्वरूपी दुरुस्ती केव्हा ? हा प्रश्न मात्र सध्या तरी अनुत्तरित आहे यासाठी नगरसेवक गौंज खान वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करून न्याय मागण्याच्या प्रयत्नात असल्याचे निवेदनातून स्पष्ट केले
प्रतिक्रिया
सदर तक्रारीच्या बाबतीत कालवा निरीक्षकाला फोन केला असता त्यांचा भ्रमणध्वनी नॉट रिचेबल येत होता त्यामुळे संबंधित विभागाची प्रतिक्रिया कळू शकली नाही