
दैनिक चालु वार्ता म्हसळा रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
सामाजिक विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही.
म्हसळा -विश्वाचा निर्माता श्री विश्वकर्मा देवतेच्या आशीर्वादाने सुतार समाजाचे वरिष्ठ मंडळाने जोपासलेली समाज परंपरा नव्या पिढीनेही जोपासत राहावी,आपली संस्कृती,उत्सव सातत्यपुर्ण आनंदात साजरे करावेत अशा शुभेच्छा माजी पालमंत्री, श्रीवर्धन मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार आदिती तटकरे यांनी श्री विश्वकर्मा जन्मोत्सव सोहळ्यात संबोधित करताना दिल्या.म्हसळा तालुका श्री विश्वकर्मा सुतार समाज संघटना वतीने सालाबाद प्रमाणे श्री विश्वकर्मा जन्मोत्सव सोहळा व श्री सत्य नारायण महापूजेचे आयोजन खारगाव बुद्रुक येथील मंदिरात करण्यात आले होते.कार्यक्रमाला श्रीवर्धन मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार आदिती तटकरे यांनी उपस्थित राहुन श्री विश्वकर्मा देवतेचे पूजन व दर्शन घेतले या वेळी त्यांनी समाजाचे सार्वजनिक विकास कामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही.खासदार सुनिल तटकरे यांच्या विकास निधीतून सामाजिक सभागृह संरक्षण भिंत बांधकामासाठी १० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असून कामाला सुरुवात झाली आहे तर रस्ता विकसित करण्यासाठी लवकरच निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.या वेळी कार्यक्रमाला आमदार आदिती तटकरे यांच्या समावेत पोलिस निरीक्षक संदीपान सोनवणे,पक्ष जिल्हा चिटणीस महादेव पाटील,तालुका अध्यक्ष समीर बनकर,माजी जीप सभापती बबन मनवे,माजी सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदिप चाचले,उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे,महीला अध्यक्षा सोनल घोले,मिनाताई टिंगरे,सरपंच अनंत नाक्ती,सरपंच अनिल बसवत,सरपंच रमेश काणसे, गजानन पाखड,समाजसेवक प्रदिप कदम,श्री गंद्रेशेठ,जेष्ठ पत्रकार उदय कळस,सुतार समाज अध्यक्ष दत्ताबुआ सुतार,उपाध्यक्ष नामदेव घुमकर,सचिव संदिप कार्लेकर,माजी अध्यक्ष पांडुरंग सुतार,सल्लागार अशोक सुतार, संतोष उद्धरकर,राजु सुतार,संदीप सुतार,जनार्धन सुतार,नथुराम सुतार,सहादेव सुतार,ग्रामस्थ महीला मंडळ आणि कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.