
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भुम:- शहरातील वृद्ध महिला राहण्यासाठी घर नसलेल्या सोनाबाई किसन ईटकर ( वय ७६) यांचे पति, मुलगा यांचे निधन झाले होते. सोनाबाई यांना एक मुलगी होती. तीचा विवाह झालेला असल्याने ती सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे राहत आहे. सोनाबाई यांना कोणाचाही आधार नसल्याने त्या आपले जीवन शहरात कोठेही भटकंती करून उदरनिर्वाह करत होत्या. कोणाकडून जे अन्न मिळेल त्यावर उपजीविका भागवत असत. सोनाबाई यांची काही दिवसापूर्वी तब्येत बिघडल्याने भूम पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचार्यांनी सोनाबाई यांना उपचारासाठी उस्मानाबाद येथे सिव्हील रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार चालू असताना दि. ५ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यु झाला. मृत्युनंतर सोनाबाई यांच्यावर अत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचा शोध पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मंगेश साळवे व त्यांच्या पथकाने घेतला. परंतु अत्यसंस्कारासाठी जवळचे नातेवाईक कोणीही पुढे आले नाहीत. मृत्यु झाल्यानंतर दोन दिवस उलटूनही कोणीही नातेवाईक येत नसल्याने भुम पोलीस स्टेशनचे अधिकारी मंगेश साळवे व कर्मचारी गणेश अदलिंग, क्षीरसागर, कर्णराज राव, परमेश्वर शेंडगे व नगर परिषदचे प्रदीप निकाळजे यांनी सोनाबाई यांचे दूरचे नातेवाईक दीपक पवार व इतर यांना सोबत घेऊन माणुसूकीचा धर्म पाळत वृद्ध सोनाबाई यांच्या मृतदेहाला ‘मुलाची भूमिका’ बजावत खाकी वर्दीतील अधिकारी पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी कुठलंही नातं नसताना त्यांच्यावर समाज स्मशान भूमीत विधीवत अंत्यसंस्कार केले.पोलीस निरीक्षक मंगेश साळवे हे खाकी वर्दीतील ‘देवमाणूस’ म्हणून परिचित आहे. वृद्धाश्रम व्यक्ती असो व मुले यांना ते नेहमी मदत करतात. तालुक्यात समाजपयोगी कार्यक्रम राबवण्यात नेहमी अग्रेसर असतात. भूम पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांच्या कामगिरीचा सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.