
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम :- तालुक्यातील पाथरूड येथे आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आज प्राथमिक आरोग्य केंद्र पाथरूड या ठिकाणी नूतन रुग्णवाहिकेचे लोकार्पण गावचे सरपंच शिवाजीराव तिकटे यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा रुग्णकल्याण समितीचेे सदस्य डॉ.चेतन बोराडे, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश गिरी डॉ.श्वेता गायकवाड ,समूह वैद्यकीय अधिकारी गणेश नागरगोजे,ऋषी पवार,परिचारिका सर्व स्टाफ रुग्णवाहिकेचे चालक शिवाजी अडसूळ तसेच इतर कर्मचारी व नागरिक आदी उपस्थित होते.
बऱ्याच कालावधीपासून नवीन रूग्न वाहिकेची मागणी ग्रामस्थांनी केली होती,विभागाचे लोकप्रतिनिधी व आरोग्य विभाग यांच्या पाठपुरावयामुळे ती पूर्ण झाली त्यांचे मनापासून आभार उपस्थित मान्यवर यांनी केले.
तसेच गंभीर रुग्ण पुढील उपचारासाठी हायर सेंटर ला घेऊन जाण्यासाठी मदत होईल असा विश्वास याप्रसंगी उपस्थितानि व्यक्त केला. रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधी यांचे आभार नागरिकांनी व्यक्त केले.