
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- माधव गोटमवाड
येथील सर्व धर्माचे एकतेचे प्रतिक असलेले सुप्रसिद्ध महान सूफी संत हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम सय्यद सईदोद्दीन रफाई रहेमतुला अलैही यांच्या ७०८ व्या व मौलवीशाहा रफाई यांच्या उर्सला बुधवार दि.८ पासून प्रारंभ झाला. संदल मिरवणुक धुमधडाक्यात काढण्यात अली. मिरवणुकीचे दर्शन घेण्यासाठी सर्व जाती धर्माचे भविक भक्तांनी एकच गर्दी केली होती.
असरच्या नमाज नंतर बुधवारी सायंकाळी ६ वाजता दर्गाचे सज्जादा सय्यद शाह मुर्तुजा मोहियोद्दीन रफाई व मुतवली सय्यद शाह मुजतबा मोहियोद्दीन रफाई यांच्या मार्गदनाखाली उर्स कमेटीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष जफरोद्दीन बाहोद्दीन यांच्या नेतृत्वाखाली रज्जबची १६ बुधवार ८ फेब्रुवारी रोजी संदल ची मिरवणुकीत ढोल, ताशाच्या गजरात शहरातील दर्गापूरा, जुनी नगरपालिका, गांधी चौक येथून मुख्यमार्गावरून मार्गक्रमण करीत रात्री उशीरा दर्गात पोहचेले. संदलची मिरणूक निघताना आ.श्यामसुंदर शिंदे, माजी आ. शंकर अण्णा धोंडगे, जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, माजी जि.प. सदस्य डॉ.पुरुषोत्तम, धोंडगे, कांग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, माजी नगरसेवक शाहाजी नळगे, कांग्रेसचे ता. अध्यक्ष बालाजी पांडागळे, माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी स्वप्नील लुंगारे, माजी नगराध्यक्ष रामराव पवार, माजी सभापती बाबुराव केंद्रे, दत्ता पाटील शिंदे, माजी नगरसेवक प्रफुल बडवणे, माजी उपनगराध्यक्ष सुधाकर कांबळे, माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी चेतन केंद्रे, लोहाचे माजी उपनगराध्यक्ष शरद पवार, माजी नगरसेवक डॉ. सतीश बडवणे, अरुण बोधनकर, बंडू कांबळे, सुहास कांबळे, राजकुमार केकाटे, व्यंकट घोडके, निलेश गौर, मधुकर डांगे, रमेश ठाकूर, राजहंस शहापुरे, कृष्णा भोसीकर, सतीश पानपट्टे, अशोक सोनकांबळे, व्यंकट नागलवाड, दत्ता घोराबांड, अजय मोरे, सतीश देवकत्ते, यांच्यासह मोठ्या संख्येने जनसमुदाय व भाविक भक्तमोठ्या संख्येने उपस्थित होते.