
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-
. जळकोट नगरपंचायतीच्या वतीने आजादी के 75 वर्ष या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्य हर घर तिरंगा स्वराज्य महोत्सव उपक्रमाअंतर्गत आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम तिरुमला मंगल कार्यालय जळकोट येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये जळकोट शहरातील सर्व शाळांनी सहभाग घेतला होता. पैकी महात्मा फुले पब्लिक स्कुलने 5 वी ते 7 वी व 8 वी ते 10 वी या दोन्ही समुह नृत्य गटामध्ये बाजी मारली. त्यात आदीवाशी नृत्य सादर करून आदिवाशीचा सांस्कृतिक वारसा जोपासला. आज नगरपंचायतीचे नगराध्यक्षा सौ. प्रभावती कांबळे यांच्या अध्यक्षते खाली व तसेच उपनगराध्यक्ष मन्मथाप्पा किडे, सांस्कृतिक सभापती संग्राम नामवाड, नगर महेश धुळशेट्टे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, व नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक व अधिकारी यांच्या उपस्थितीत महात्मा फुले पब्लिक स्कुलचे प्राचार्य श्रीकृष्ण सानप, उपप्राचार्य किरण गोंड यांचा यथोचित सत्कार करून शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. यासाठी शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख कासार मॅडम, प्रा मनोज जाधव, उप.प्राचार्य किरण गोंड प्रा. राजेंद्र वाघमारे, प्रा राम देवपुजे प्रा. मणिषा नरसाने, अश्लेषा गडदे, गीतांजली चोले, अकांक्षा आचमारे, वस्तीगृह अधिक्षक खोकले सर, खोकले मॅडम,आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले होते. सदर विद्यार्थ्याचे व शिक्षक वृदांचे संस्थेचे संस्थापक सचिव चंदन पाटील, संस्थेचे एमडी सि एन बिरादार, प्राचार्य चंद्रशेखर कळसे, प्राचार्य एम जे वाघमारे, प्राचार्य शिवाजी गोताळे,नाना पवार, भूषण नागरगोजे, आर पी नागरगोजे, बी के मोरे, आदींनी अभिनंदन व शुभेच्छा दिले.