
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): :
प्राथमिक आरोग्य केंद्र अंतोरा येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज पराडकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्नेहल कासारे यांच्या सूचनेप्रमाणे व शासनाने दिलेल्या कार्यक्रमानुसार जागरूक पालक सुदृढ बालक व रोगनिदान शिबिर अंतोरा येथे आयोजित करण्यात आले होते
शिबिराचे उदघाटन सरपंच उज्वला मुंदाने यांनी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पुजन व मालार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली व आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सुदृढ बालक राहण्यासाठी पालकांनीच खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मत सरपंच उज्वला मुंदाणे यांनी व्यक्त केले
त्यापुढे बोलतांना सरपंच म्हणाल्या की,आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनाचे पालन पालकांनी केल्यास मूल कधीच आजारी राहू शकत नाही त्यामुळे दिलेल्या सूचनेचे पालन करण्याची गरज असल्याचे मत सरपंच यांनी व्यक्त केले सदर
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच तथा शिक्षिका शालिनी कोडापे तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ दिपक वाघमारे डॉ. पायल वरके डॉ.भागवत राऊत डॉ. हिमानी मानकर डॉ. मनोज नाकाडे आरोग्य सहाय्यक दिलीप उटाणे उमेश उन्होंने यांची प्रमुख उपस्थिती होती आरोग्य शिबिरात ३४५ बालकांच्या विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्यात या शिबिराला गावातील नागरिकांनी आपल्या मुलाला तपासून घेण्यासाठी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक वाघमारे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे महत्त्व पटवून दिले गावागावात सुरू असलेल्या कार्यक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे अशी आव्हाने त्यांनी केले
प्रास्ताविक औषध निर्माण अधिकारी श्याम गरड यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य सेविका सरोज वानखेडे, संध्या रामटेके अश्विनी केंद्रे, अपेक्षा शिरभाते, आशा वर्कर विद्या केचे, सविता खांडेकर, प्रफुल्लता डोळस, आशा डेहनकर सविता चापले, अमन,सुरज शेळके इत्यादींनी सहकार्य केले