
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर : देगलूर शहरात जय हिंद सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे प्रजासत्ताक दिन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून जय हिंद सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शहरात वेगवेगळ्या समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते तसेच गेल्या अनेक वर्षापासून रक्तदान शिबीरही भरविण्यात येते, कोरोना सारख्या महामारीच्या काळात देखील जय हिंद सोशल फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करून जास्तीत-जास्त रक्तदात्यांकडून रक्त जमा करून रक्तपेढ्यांना पाठविण्यात आले.
त्यामुळे जयहिंद सोशल फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शहरातून मोठ्या प्रमाणात नेहमीच प्रतिसाद मिळतो.
जय हिंद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश आऊलवार यांच्या नेतृत्वात त्यांच्या मित्रपरिवारा तर्फे दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत शहीद कॅप्टन द्याडे चौक,शहाजी नगर, देगलूर येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या रक्तदानाच्या पवित्र कार्यात आपण सहमित्रपरिवार सहभाग घेऊन हे पवित्र माणुसकीचे नाते अखंड जपूया असे म्हणत सर्वांना सहभाग नोंदविण्याचे आवाहन राजेश आऊलवार मित्रपरिवारातर्फे करण्यात आले आहे.