
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
तालुक्यातील आगामी निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन गाव,वाडी,तांडा तिथे शाखा स्थापन करून शिवसेना (उध्दव ठाकरे) पक्षाचे धैयधोरण व शिवसेना पक्षप्रमुखानी पक्षासाठी त्यागाची भुमिका घेणारे ठाकरे कुटुंब यांच्यासाठी विरोधकाना जागा दाखवण्यासाठी मतदारसंघात शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी अद्यावत यंञना राबवून स्थानिक पातळीवर जाऊन ५० हाजार सदस्य नोंदनी करणार असे लोहा कंधार विधानसभा प्रमुख बाळासाहेब क-हाळे यांनी लोहा येथील शिवसेना संपर्क कार्यालयात माहिती दिली.
लोहा तालुका शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचा बाल्ले किल्ला संमजला जातो.पण मागील काळात राज्यात दगाबाजीने सत्ततंर झाले आणी शिवसेना (उध्दव ठाकरे) महाआघाडीची सत्ता संपुष्टात आली पण विरोधक शिवसेना उद्धव ठाकरे गटाची प्रतिमा मलिन करण्याचा डाव आखत आहेत परंतु विरोधकाल जाग दाखवण्यासाठी तालुक्यासह मतदारसंघात सदश्य नोंदनीचा उपक्रम हाती घेऊन गाव,वाडी,तांडा येथे शाखा स्थापनेचा संकल्प करुन नुतन सदस्य नोंदनीला सुरुवात केली आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाची ताकद दाखवण्यासाठी गाव तिथे शाखा स्थापन करून नुतन सदस्य नोंदनीला सुरुवात केली आहे या मोहिमेत तालुक्यातुन ५० हाजार सदस्य नोंदनी करुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटात पुन्हा युवक जोमाने मतदारसंघात कामाला लागेल.आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पक्ष वाडीची मोहिम हाती घेण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाची ताकद दाखवण्यासाठी तालुक्यासह मतदारसंघात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेला शासकीय पातळीवरील विविध योजनेच्या संदर्भाने आडीआडचन असेल तर तालुक्याच्या ठिकाणी जाऊन संबंधित योजनेच्या विभाग प्रमुखांना भेटुन कामाचे काय झाले आशी आता विचारपुस करण्याची गरज नाही, आणी पाठपुरावा करायची गरज नाही शासकीय विविध विभाग प्रमुखाचे मोबाईलचे फोननंबर सोबत घेवून त्याच ठिकानावरुन संबंधत शासकीय विभाग प्रमुखांना आर्जदाराच्या योजने संदर्भात काय कारवाई केली कि फाईल घायाळ केली याची शहानिशा करुन संबंधीत आर्जदारा गावात जाऊन माहिती देण्यात येईल झालेल्या त्या दिरंगाईचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. यासाठी अद्यावत यंञनेचे साहित्य त्या सोबत वाहान दोन व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे.
येणाऱ्या काळात शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष सत्तेत येण्यासाठी स्थानिक पातळीवर गाव वाडी तांडा मोहिम भक्कमपणे राबवून यशस्वी करण्यात येईल अशी माहिती शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे लोहा कंधार याविधानसभा प्रमुख बाळासाहेब क-हाळे यांनी माहिती दिली.यावेळी लोहा कंधार मतदारसंघतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते