
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच हवामानात
बदल होऊ लागला आहे. वातावरण बदलाचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असून रात्री थंडीचा गारवा तर दिवसा उष्णता असे वातावरण तयार होत असल्याने ताप, सर्दी, खोकला या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.हिवाळा समाप्त होण्याच्या मार्गावर असून आता उन्हाळ्याची चाहुल लागायला लागली आहे. त्यामुळे वातावरणातील बदल याला कारणीभूत ठरत आहे. कधी थंडी तर कधी उष्णता यामुळे विविध प्रकारच्या आजारात वाढ होत आहे. आजाराचा प्रभाव वृध्द व बालकांना होत असून ग्रामीण भागासह शहरी भागातही खाजगी रुग्णालयात रुग्णाची गर्दी वाढत आहे. एकंदरीत हवामानातील बदलामुळे त्याचा आरोग्यावर परिणाम होत असून आजारामुळे सर्वसामान्यांना आर्थिक झळ पोहचवत आहे.