
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना : मासेमारी करण्यासाठी तलावात गेलेला तरुण बेपत्ता झाल्याची घटना मंठा तालुक्यातील तळतोंडी शिवारात असलेल्या तलावात घडलीय. सचिन हरिभाऊ राक्षे असे या तरुणाने नाव आहे.
सचिन राक्षे हा आपल्या मित्रांसह तळतोंडी शिवारातील असलेल्या तलावात मासेमारी करण्यासाठी गेला होता. मासेमारी करीत असताना त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. यामुळे तो पाण्यात बुडाला असल्याची माहिती त्याच्या सोबत असलेल्या तरुणांनी गावकऱ्यांना दिली. यानंतर गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयन्त केला. मात्र त्यांना त्यात यश आल नाही.
तलावातील गाळात फसल्याचा अंदाज
यानंतर ग्रामस्थांनी घटनेची माहिती प्रशासनाला कळविताच प्रशासनच्या वतीने घटनास्थळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. बुडालेल्या तरुणाचा शोध पथकाकडून घेतला जात आहे. तलावात गाळ असल्याने हा तरुण पाण्याखाली गाळात फसला असल्याचा अंदाज या पथकाकडून वर्तविला जात आहे.