
दैनिक चालू वार्ता साळवण :
तिसंगी (ता.गगनबावडा) म.ह.शिंदे महाविद्यालय स्तरावर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे दिवसभरातील महाविद्यालयीन कामकाजावर त्याचा परिणाम होताना दिसून आला.
राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नीत महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावर अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रकारच्या सहा मागण्या मान्य करण्यासाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. याचा महाविद्यालयातील चालू परीक्षा कामावर होत असून , विद्यार्थी ना याचा त्रास होत असल्याचे दिसून येते.
म.ह.शिंदे महाविद्यालय समोर बसून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची सुरुवात केली. यावेळी मुख्य लिपिक एम.पी.शिंदे यांनी सर्वाना मार्गदर्शन केले.
वरिष्ठ लिपिक डी. एस.सातपुते, प्रयोगशाळा साहाय्यक व्ही. ए. पोवार ग्रंथपाल परिचर एस.पी.चव्हाण, आर.आर.नलवडे तसेच एबी.शिंदे, वाय. एस. तेली, डी. इन. पोवार, व्ही.के.पाटील,
जी.इन. सरदेसाई, आर.आर.चव्हाण, जे. बी. सूर्यवंशी, ए. ए. पाटील इ. सर्व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना वरिष्ठ लिपिक एम.पी.शिंदे व उपस्तीत कर्मचारी स्टाफ.