
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुखेड दि २० (प्रतिनिधी ) येथील जिजाऊ ज्ञानमंदिर सेमी इंग्लिश स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
ता . १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक ज्ञानोबा जोगदंड प्रमुख उपस्थित जगदीप जोगदंड तर प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी देवकते सिरुरकर , नरसिंग इमडे
आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन व कार्य याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तर नर्सरीतील व्यंकटेश गिरी , गणेश मोरे युकेजीतून तन्मय जगताप , संचिता जुन्ने , आरोही जायम्हेत्रे ‘ प्रियांशी जमदाडे या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. चैताली गोंडलवाड समृद्धी सस्त्रमोड , आरुषी इमडे या मुलींनी पाळणा म्हणला. नर्सरीच्या आरोही जायम्हेत्रे या चिमुकल्या मुलीने शिवगर्जना व शिवआरती गाऊन सर्वांकडून टाळ्या मिळविल्या . हरहर शंभो या गाण्यावर इयता पहिलीच्या मुलांनी ग्रुप डॉन्स केला. त्यात महादेवाच्या भूमिकेत हर्षवर्धन चौहान तर पार्वतीच्या भूमिकेत समृद्धी गुट्टे व सहकलाकार म्हणून आर्या श्रीरामे , रितेश जमदाडे , दिव्या रायवाडे , प्रियल चव्हाण ‘ गणेश आचेवाड , स्वरा तमशेट्टे , कृष्णकांत जुन्ने , अनाया चौधरी , अलिशा शेख , विराज संगेवार आदी सहभागी झाले होते. तर ‘ हे राजे जी रं जी रं जी ‘ गाण्यावरील ग्रुप डान्स मध्ये पार्थ हुरजळ , वेदांत उमाटे , द्रोण गव्हाणे , पियुष कराळे , सुमित राठोड , दिव्या मुळके , आरोही मुकनर ‘ अनुष्का कोरटकर , रोहिणी माडावाड आदी विद्यार्थी सहभागी झाले होते. इयता दुसरीतून जय जय शिवराय या गाण्यावर रेवा गायकवाड संस्कृती इंगोले या मुलींनी तर माय भवानी या गाण्यावर विक्रम पाटील आणि एकच राजा इथे जन्मला या गाण्यावर राधिका गालेवाड या मुलींनी आपला उत्कृष्ट असा डान्स सादर केला. तिसरीतील विनीता चव्हाण या मुलीने दैवत छत्रपती हे गीत तर श्रेया जमदाडे , कृष्णा खांडेकर , नितीन गायकवाड या विद्यार्थ्यांनी एकच राजा हे गीत गायले.
झुलवा पाळणा या गीतावर रेवा गायकवाड , आरोही जोशी , सृष्टी इबितदार या मुलींनी तर आई भवानी या गाण्यावर संस्कृती इंगोले , जयभवानी जय शिवाजी या गाण्यावर मृण्मयी जोशी या मुलींनी उत्कृष्ट असे नृत्य सादरीकरण केले. भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकशे पंच्याहतरच्यावर असल्याने सदरील कार्यक्रम नॉनस्टॉप दोन दिवस घ्यावा लागला . विद्यार्थ्यांनी स्वतः होऊन उत्स्फुतपणे आपला सहभाग नोंदवून आपल्या कलाकौशल्या ला यानिमित्ताने चांगलीच वाट मोकळी करून दिली. दुसऱ्या दिवशी आपले अध्यक्षीय भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. ‘ शिवबा ‘ या स्वंयरचित गीताने व गीतगायनाने कार्यक्रमाचा समारोप केला. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व दिग्दर्शन करण्यासाठी पर्यवेक्षक सुधाकर जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. शकुंतला गिते मॅडम , जाधव मॅडम , बिरादार मॅडम , जगताप मॅडम , साहिराबानु शेख मॅडम , जोशी मॅडम , अटाळकर सर , गिर्दवाड मॅडम , शेख सर , राठोड मॅडम , वडजे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. याशिवाय सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे बहारदार असे सुत्रसंचलन आश्विनी मॅडम यांनी केले . तर आभार सुधाकर जोगदंड यांनी मानले.