
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
मुखेड येथून जवळच असलेल्या सावरगाव पिर. येथील गंगाबाई माध्यमिक विद्यालयात पालक मेळावा व वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक व समूह नृत्याने रंगले.
याबाबत अधिक माहिती अशी की सावरगाव पि. येथील गंगाबाई माध्यमिक विद्यालयात 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पालक मेळावा व वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर किशनराव राठोड साहेब हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष भाऊ राठोड गटशिक्षणाधिकारी कैलास होणधरणे, माजी सरपंच नारायणराव चमकुरे, मनोज भाऊ कांबळे, सरपंच प्रतिनिधी मुजाहेद इनामदार आदीसह संस्थेतील विविध शाखांचे शाखाप्रमुख पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य संतोष भाऊ राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांना परिश्रमा ला पर्याय नाही शॉर्टकट मार्गाने यश मिळत नाही त्यामुळे कॉफीच्या मागे न लागता परिश्रम करून आपण जीवनात यशस्वी व्हावे. यावेळी उपस्थित पालकांना संबोधित करताना संतोषभाऊ राठोड म्हणाले की आपल्या शाळेला पहिल्यांदाच दहावी बोर्ड परीक्षेचे केंद्र मिळाले आहे. त्यामुळे पालकांनी या केंद्रावर गर्दी न करता परीक्षा शांततेत सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे यांनीही पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी पाटील कबीर, पत्रकार यशवंत बोडके, विश्वंभर पाटील शिंदे, मुख्याध्यापक शिवाजी डावकरे, मुख्याध्यापक संदीप गेटकेवार, मुख्याध्यापक शमशुद्दीन शेख, आदि उपस्थित होते.
पालक मेळाव्याचा समारोप संस्थेचे अध्यक्ष कर्मवीर किशनराव राठोड यांनी केला. यावेळी त्यांनी ही शाळा उभारण्यामध्ये आलेल्या अडीअडचणी सांगून अत्यंत कष्टाने ही शाळा उभा केली असून आज येथे शेकडो मुली आणि मुले अतिशय आनंदाने दर्जेदार शिक्षण घेत आहेत . याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो. आपल्या शाळेचा नावलौकिक वाढविण्यासाठी सर्व पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यानंतर वार्षिक स्नेहसंमेलनाला मोरया मोरया या समूहनृत्याने प्रारंभ झाला. यामध्ये कु. प्रतीक्षा सोनकांबळे, कु. पूजा कोद्रे, धम्मकन्या कांबळे, कु.शिवभक्ती मठपती आदिनी सहभाग घेतला. यानंतर चिमुकली कु. आराध्या वडजे हिने सुंदर अशी ” राया मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा ना ” ही लावणी सादर केली. यावेळी विठ्ठल श्रीरामे आणि सदाशिव तारशेटे यांनी “‘ मुळीच नव्हते रे कान्हा” ही गवळण अत्यंत सुंदर अशी सादर केली. याही गवळणीला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाडात उदंड प्रतिसाद दिला. पालक मेळाव्याचे व वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मनोहर पाटील सूर्यवंशी यांनी केले. पालक मेळाव्याचे आणि स्नेहसंमेलनाचे सुरेख सूत्रसंचालन श्री संजय पाटील श्रीरामे यांनी केले. तर आभार प्रदर्शन भीमराव पाटील वडजे यांनी केले.
पालक मेळावा आणि वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक मनोहर पाटील सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक रवींद्र चिल्लरगे, श्रीराम पवार सर, राहुल सोनकांबळे, चंद्रकांत जाधव, श्रीमती नारलावार मॅडम, व्यवहारे मॅडम, वंजे सर, , मुसंडे मामा आणि सुभाष शेळके आदींनी विशेष परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनाच्या तयारीसाठी कोरिओग्राफर तथा नृत्य दिग्दर्शक स्वप्निल वाडेकर, अर्चना वाडेकर, रंगभूषा पवन येवतीकर, निखिल सोनकांबळे, नरेश पोतदार यांची तर तर फ्लेमिंगो फ्रेम्सचे संचालक डॉ. शिवानंद स्वामी यांनी या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण केले.