दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी -विजयकुमार चिंतावार
प्रत्येक घटकातील नागरिकांनी आपल्या पिढी साठी आणि निरोगी आयुष्यासाठी सर्वांनी मिळून निसर्गाचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
वाढदिवस, लग्न समारंभात भेटवस्तू वर खर्च करण्यापेक्षा प्रतेकांना झाडांची रोपटे देउन त्याचे संगोपन करा म्हणजे निसर्गाचा र्हास होणार नाही आणि आणि प्रदुषण नियंत्रित राहिल.
त्याच बरोबर प्रत्येकाला कायद्याचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे असे मत भोकर जिल्हा सत्र न्यायालयाचे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश मा.डि.डि.माने यांनी बोलताना व्यक्त केले. ते दिनांक २२ एप्रिल रोजी पांडुरणा ता भोकर येथील जि. प. शाळेत तालुका विधी सेवा समिती भोकर व पंचायत समिती भोकर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित कायदेविषयक जनजागृती व माझी वसुंधरा कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी न्यायाधीश मा.डी.डी.माने, पंचायत समिती प्रतिनिधी अंकुश राठोड ,ता.विधी सेवा समितीचे मंगेश पेदे, भुजंग सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की मानवाला पुर्वी अन्न, वस्र,निवारा ह्या गरजा होत्या त्या मुळे कुठले प्रदुषण किंवा रोगराई निर्माण होत नव्हती पण सध्या च्या काळात यंत्रीकरणाचा वाढता वापर, रासायनिक खते औषधी,पेट्रोल डिजेलचा वाढता वापर आणि झपाट्याने होत असलेली वृक्ष तोड या मुळे निसर्गाचा र्हास होत असुन त्याचा परिणाम मानवी जिवणावर होत आहे त्या मुळे निसर्गाचे संवर्धन सर्वांनी केले पाहिजे.
त्या बरोबरच सर्वच व्यक्तींना कायद्याचे आवश्यक ज्ञान असणे गरजेचे आहे. सक्षम व सर्वव्यापी सक्षम समाज घडवण्यासाठी कायद्याचा महत्त्वाचा वाटा आहे. म्हणून कायद्याचे ज्ञान गावागावात तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कायद्या पुढे ना कोणी श्रीमंत नाही व कोणी गरिब नाही. आपण सर्व समान आहोत. त्यामुळे गरीब श्रीमंत, ज्ञानी अज्ञानी, लहान मोठा असा भेदभाव न बाळगता सर्वांना समानतेची वागणूक देऊन सहविचाराने व बंधूभावाने वागुन सुखी जीवन व समृद्ध राष्ट्र घडवणे गरजेचे आहे असे सांगितले.
या कायदेविषयक शिबिराचे प्रास्ताविक भोकर न्यायालयाचे अड.मंगेश पेदे यांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षक गंगाधर वानोळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार पत्रकार कमलाकर बरकमकर यांनी मांनले. या कार्यक्रमास गावच्या सरपंच सौ. गंगा बालाजी दासरवाड, उपसरपंच भटू आडे, माजी सरपंच रामधन राठोड,से.स.सो.सदस्य खिरोजी गोविंदवाड,ग्रा.प.सदस्य केशव निमलवाड,संतोष दर्शनकर,शा.शिक्षण स. अध्यक्ष गुलाब राजेमोड उपा. रेणुका दुधारे,सविता बरकमकर,गौरी दासरवाड ग्रामसेवक तोडे, व्यंकट चितकिंदेवार मुख्याध्यापक एस. एस. गोपिनवार सेवक गोपाळ दासरवाड, गुलाब राजेमोड आदिसह गावातील प्रतिष्ठित नागरिक,
मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
