
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.26 पुणे-नगर महामार्गावर कारेगावच्या पुढे रस्ता दुभाजकाचे लोखंडी रेलिंग तुटून रस्त्यावर आले असून त्यामुळे या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस गंभीर अपघात होण्याची शक्यता असून हे लोखंडी रेलिंग ताबडतोब हटविण्यात यावे अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. पुणे-नगर महामार्गावर कारेगावच्या पुढे एक वळण असून त्याच्या थोड्याच अंतरावर रस्ता दुभाजकाचे रेलिंग तुटले असून या ठिकाणी वळण असल्याने रात्रीच्या वेळेस गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे ते धोकादायक रेलिंग तातडीने काढण्यात यावे अशी मागणी वाहनचालक करत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नवनाथ शेळके यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही तातडीने कर्मचारी पाठवून ते धोकादायक रेलिंग काढून घेतो. असे त्यांनी बोलताना सांगितले.