
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार/कौठा:-गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कौठा काटकंळबा धानोरा जाकापुर येथे वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने भुईमूग ऊस पिकांचे प्रचंड नुकसान झाले तर चंद्रकांत देशमुख यांच्या बैलांवर विज पडून बैल दगावला आहे .
कंधार तालुक्यातील कौठा काटकंळबा राऊतखेडा धानोरा तेलूर जाकापुरआदि गावात वादळी वाऱ्यासह पावसाने वृक्ष उन्मळून पडले तर अनेकांच्या घरावरील पत्रें पंतग उडाल्या सारखी हवेत उडाली होती गोविंद चौधरी यांच्या घरा वरिल पत्रे उडाल्याने संसार उपयोग साहित्याची नासडी झाली देवदुत म्हणुन काही तरुणानी चौधरी यांच्या घरांवर भर पावसात सतिष देशमुख स्वप्निल देशमुख लक्ष्मण मठपती वैभव देशमुख यांनी घरा वरिल पत्रें टाकून धिर दिला चंद्रकांत देशमुख यांच्या बैल दगावला तलाठी संतोष जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत भेट दिली.