
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : अमरावती येथे युरिया खरेदी करण्याकरिता गेलेल्या एका कार्यकर्त्यांनी एका कृषी केंद्र संचालकास शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या कारणावरून अंजनगाव सुर्जी तालुका कृषी सेवा संघाने दिनांक २२ जून रोजी अंजनगाव सुर्जी तहसीलदार तथा गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले.निवेदन देऊन घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत शहरातील संपूर्ण कृषी सेवा केंद्र दिनांक २२ जून रोजी बंद ठेवण्यात आले होते.
अमरावती येथील कृषी समृद्धी या कृषी सेवा केंद्राचे संचालक राठी यांच्याशी हुज्जत घालत नितीन मोहोळ यांनी चक्क त्यांना मारहाण केली.या संपूर्ण प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून त्याचे पडसाद अंजनगाव सुर्जी तालुक्यात उमटल्याचे दिसले.
कृषी केंद्र संचालकाला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सर्व कृषी केंद्र संचालकांनी आपली दुकान बंद करून थेट तहसील कार्यालय गाठले.अमरावती शहरात झालेल्या या प्रकारामुळे आरोपीवर लवकरात-लवकर कारवाई झालीच पाहिजे करिता तहसीलदार अभिजीत जगताप,तालुका कृषी अधिकारी राठोड यांना यावेळी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील संपूर्ण कृषी केंद्र संचालकांनी निवेदन सादर केले.
निवेदन देतेवेळी कृषी साहित्य संघाचे तालुकाध्यक्ष जगदीश सारडा,शहराध्यक्ष पंकज मोदी,उपाध्यक्ष दीपक कासट,सचिव राजू जोरापुरकर,संजय बानाईत,सुधाकर टिपरे,विक्रम पाठक,संजय पोटदुखे,शंकर मालठाणे,प्रदीप देशमुख,राजू धोटे,गिरीश पिसोळे,सतीश जांबे,प्रभाकर लोळे,संदीप पवार,राजेंद्र बारब्दे,नंदकिशोर लोखंडे,वसंत भगत,शिवम पवार,राजू निचळ,सुरज ढवळे,सुनील येवले सह आदी शहरातील कृषी केंद्र संचालक उपस्थित होते.