दैनिक चालू वार्ता
फुलवळ सर्कल प्रतिनिधी नवनाथ वाखरडकर
ग्राहक हा बँकेचा कणा असून बँक आणि ग्राहक यांच्यातील आम्ही दुवा आहोत , तेंव्हा ग्राहकांना वेळेत व तत्पर सेवा देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असा विश्वास भारतीय स्टेट बँकेचा आज ६८ वा वर्धापन दिन साजरा करत असतांना एसबीआय बँक शाखा बहाद्दरपुरा येथील शाखाधिकारी प्रशांत सोनूले यांनी आपल्या मनोगतातून ग्राहकांना दिला.
एसबीआय बँक शाखा कंधार चे शाखाधिकारी विलास रिनायत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी एसबीआय शाखा बहाद्दरपुरा येथे येथील रोखपाल अविनाश काळे , अभिजित बयास , दीपक गुट्टे , सिद्धेश्वर वंजे यांची उपस्थिती होती. बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बहाद्दरपुरा येथील मातोश्री अनुसयाबाई घोलप आश्रम शाळेत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शालेय विद्यार्थी , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . त्यानंतर केक कापून ६८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शाखाधिकारी विलास सोनूले यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत असतांना आपल्या बँक शाखेचा व कार्यपद्धती चा लेखाजोखा मांडत वर्षानुवर्षाची परंपरा असलेल्या भारतीय स्टेट बँकेवर ग्राहकांचा अन्य बँकेपेक्षा जास्तीचा विश्वास असल्याकारणाने इतर बँकेच्या तुलनेत आपल्या बँकेकडे खातेदारांची संख्या जास्तीची असून ग्राहकांच्या प्रमाणात आपल्याकडे बँकेसाठी जागा अपुरी असून कर्मचारी संख्याही कमी पडत आहे . त्यामुळे कांही प्रमाणात ग्राहकांना याचा त्रास होतोय याची आम्हाला जाणीव असून लवकरच आपली बँक नवीन इमारती मध्ये स्थलांतरित करणार असून बहुदा कर्मचारी संख्या पण वाढेल त्यामुळे येणाऱ्या काळात ग्राहकांना कसल्याच प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत असे मत व्यक्त करत आपण येथे रुजू झाल्यापासून ग्राहक व बँक याच्यात सुसूत्रीतपणा यावा यासाठी यंत्रणेत अनेक बदल केले असल्याचे सांगताना ग्राहकांनीही सहकार्याची भावना ठेवत आपापली कामे वेळेत करून घेण्याला प्राधान्य द्यावे असे सांगितले.
यावेळी परमेश्वर पेठकर , राजीव राठोड , बालाजी भोसीकर , संतोष नामपाठक , व्यंकटेश पेठकर , श्रीकांत केंद्रे , गोविंद परळकर , सुधाकर पेठकर , धोंडीबा बोरगावे यांच्यासह अनेक ग्राहक या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमानंतर लगेच उपस्थितांसाठी शाखेच्या वतीने अल्पोपहार , चहा ची उत्तम सोय करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक , सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार येथील रोखपाल अविनाश काळे यांनी व्यक्त केले.
