
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर: प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या ९ वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीचा व जनसेवेचा लेखाजोखा जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी देशभर मोदी @९ महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे.
सदर अभियानाच्या अंतर्गत आज येथील देगलूर शहर व ग्रामीण युवा मोर्चाच्या वतीने शहरात मोटार सायकल रॅली , नवमतदार नोंदणी व देगलूर महाविद्यलयात युवा संवादचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नांदेड जिल्हा ग्रामीणचे भाजप जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब यांनी मोटार सायकल रॅलील झेंडा दाखवून सुरुवात करून दिली..
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून ते शहरातील मुख्य मार्गाने जिजाऊ माँ साहेब यांच्या चौकात मोटार रॅली चे आयोजन करण्यात आले.
त्यानंतर देगलूर महाविद्यलयात विद्यार्थ्यासोबत “युवा संवाद” चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी आमदार सुभाषराव साबणे साहेब , भाजप युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस तथा मराठवाडा समन्वयक श्री.अरुण जी पाठक,नांदेड जिल्हा युवा मोर्चा प्रभारी जि.प सदस्य राजू भैया देशमुख,नांदेड जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस रोहित जी पाटील,तसेच भाजप ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर,भाजप ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील माळेगावकर, भाजप देगलूर शहराध्यक्ष अशोक गंदपवार, मन की बात कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक शिवकुमार देवाडे, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष तथा सरपंच संतोष पाटील, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुन्ना सावकार पबितवार ,भाजप नांदेड जिल्हा सचिव अनिल पाटील खानापूरकर ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यादवराव फिरंगे, ओबीसी जिल्हा चिटणीस अवधूत मामा भारती, भारतीय जनता पार्टी देगलूर ग्रामीणचे सरचिटणीस अशोक डुकरे, मल्लिकार्जुन पाटील, देगलूर शहर भाजप सरचिटणीस गंगाधर दाउलवार, देगलूर नगर पालिकेचे माजी नगरसेवक प्रशांत दासरवार ,भाजप जिल्हा ग्रामीण ओबीसी नेते अशोक साखरे,भाजप ग्रामीणची तालुका उपाध्यक्ष तुकाराम पाटील कोकणे, भाजप ग्रामीण तालुका उपाध्यक्ष नामदेव थडके, भाजप युवा मोर्चा ग्रामीण जिल्हा सरचिटणीस धीरज पाटील,सुगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच पुलचूवाड काका,भाजप देगलूर तालुकाध्यक्ष मागासवर्गीय तालुका अध्यक्ष गोपाळ टेबुर्णे,भाजप युवा मोर्चा बिलोली शहराध्यक्ष इंद्रजीत तुडमे,भाजप देगलूर अनुसूचित जातीचे शहराध्यक्ष सचिनजी कांबळे,देगलूर शहर व्यापारी आघाडीचे कमटलवार सावकार,अजिंक्य जी देशमुख नरंगलकर,राजू पाटील भोकसखेडकर,ताटे साहेब,राजू पाटील,भाकरे,कांबळे,तसेच उपस्थित अनेक पदाधिकाऱ्यांनी “बाईक रॅली,युवा संवाद संमेलन व नव मतदार नोंदणी” अभियानास या परिसरातील युवक व युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला..
कार्यक्रम यशस्वी ते साठी भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष अशोक कांबळे देगलूरकर , भाजप युवा मोर्चा ग्रामीणचे तालुकाध्यक्ष पंकज देशमुख, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील थोटवाडीकर ,सोशल मिडिया जिल्हा संयोजक संजीव पांचाळ शहापूरकर, भाजप युवा मोर्चा देगलूर शहर सरचिटणीस सचिन कांबळे ,भाजप युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष संतोष मरतुळे, युवा मोर्चा अनुसूचित जातीचे युवा अध्यक्ष सचिन कांबळे व अमर पब्बावार यावेळी असख्य कार्यकर्ते , पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते……
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय आणि कल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकापर्यंत पोहोचण्याचा संकल्प यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे…