
दिपक पा कानवटे मिञ परीवाराचा पुढाकार
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे शिवसंकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक पाटील कानवटे मित्रमंडळाच्या वतीने पालम तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र योगीराज निवृती महाराज देवस्थान पेंडु व श्री संत मोतिराम महाराज तिर्थक्षेत्र फळा या ठिकाणी देवशयनी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांना फराळ व शुद्ध पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले.
यावेळी दिपक पाटील कानवटे, शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार, नगरसेवक भास्करराव पाटील पवार, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बंडू पाटील वडजे, गणेश मोरे, शिवराज मुंडकर, आदी मित्रमंडळी उपस्थित होती.