
विकासरत्न संजय नाना गाढवे प्रतिष्ठान च्या वतीने शहरातील डॉक्टर्स यांचा डॉक्टर डेच्या दिवशी सन्मान करून सत्कार करण्यात आला यावेळी भूम शहरातील डॉक्टर.
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
नवनाथ यादव
भूम– विकासरत्न संजय नाना गाढवे प्रतिष्ठान च्या वतीने व मा.नगराध्यक्ष संजय गाढवे व जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.संयोगीता गाढवे यांच्या हस्ते शनिवारी साहिल कॉम्प्लेक्स येथे डॉक्टर्स डे चे औचित्य साधून शहरातील सर्व डॉक्टर्स बंधू भगिनींचा सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रास्ताविकेतून बोलताना संयोगीता गाढवे म्हणाल्या की,आपण सर्व डॉक्टर्स भूम सारख्या छोट्या शहरात देखील अतिशय उत्तम प्रकारे रुग्णांची सेवा करत असून यापुढे देखील आपणास सेवा करत असताना काही मदत लागल्यास आम्हाला कधीही हाक द्या,आम्ही ती मदत करण्यास कटिबद्ध असल्याचे संयोगीता गाढवे यांनी सांगितले व सर्वांनी एकत्र येऊन एक युनिट तयार करून हृदय विकारा च्या आजाराचे काही रुग्ण बार्शी,उस्मानाबाद याठिकाणी उपचारासाठी दाखल करेपर्यंत काही रुग्ण प्रवासा दरम्यान मृत्यू पावतात,अशा रुग्णांना आपल्याच शहरात तात्काळ उपचार मिळावा यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन संयोगीता गाढवे यांनी यावेळी केले.तर अध्यक्षीय भाषणात संजय गाढवे म्हणाले की,साक्षात ईश्वराचे दुसरे रूप म्हणजे डॉक्टर असून प्रत्येकाचे जीवन हे डॉक्टर वर अवलंबून आहे.म्हणूनच ते ज्या प्रमाणे वर्षभर दिवस रात्र कोणताही भेदभाव न करता रुग्णांची सेवा करतात त्या प्रमाणे त्यांचाही कधीतरी सन्मान होणे आवश्यक आहे असे म्हणत गाढवे यांनी सर्व डॉक्टर्स यांचे कौतुक केले.यावेळी शहरातील डॉ प्रदीप मोरे , डॉ श्रीराम कोकाटे ,डॉ सचिन देशमुख , डॉ शांतीलिंग अंबूरे , डॉ मधुकर बोटकर ,डॉ रणजीत खैरे , डॉ पंढरीनाथ भोरे , डॉ जामकावळे , डॉ वनवे , डॉ कुलकर्णी , डॉ अमोल शेंडगे , डॉ बालाजी बारस्कर ,डॉ प्रसाद मोरे , डॉ प्रशांत कोकणे , डॉ अमोल कुटे , श्रीमती डॉ खैरे , श्रीमती डॉ कुटे , श्रीमती डॉ बळे , श्रीमती डॉ शेंडगे , श्रीमती डॉ उगलमुगले , श्रीमती डॉ पोथरे , डॉ राजेंद्र वनवे आदि डॉक्टर्स बंधू भगिनींचा सन्मान करण्यात आला तसेच सेट परीक्षेत ग्रंथालय व माहिती शास्त्र विषयात उत्तीर्ण झालेल्या प्रा.हरी महामुनी यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.नगराध्यक्ष संजय गाढवे हे होते तर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुरज गाढवे , प्रभाकर गाढवे , विष्णु शिंदे , सुनील थोरात , मुशीर शेख , संदीप लष्कर , सतीश लष्कर , बाळासाहेब अंधारे , बालाजी माळी , सुरज नरोटे , संतोष सावंत,राजू गाडे , सोनू सोलंकर , मुकुंद लगाडे,विश्वनाथ फल्ले आदींची प्रमुख उपस्थिती होती. सर्वाना डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा दिल्या…