
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर: 01 जुलै 2023 ला नांदेड येथे कामगार कल्याण मंडळाचे 70 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कामगार कल्याण मंडळाचे माजी संचालक शिवाजीराव धर्माधिकारी,माजी संचालक एकनाथ मामडे, गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त विजय रणखांब, रत्नाकर शिंदे,के.डी.देशमुख , कामगार अधिकारी प्रसाद धस , विलास मेंडके, नागोराव पोलावार,नलावारसर व अन्य कामगार व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. तसेच कामगार कल्याण मंडळाच्या आवारात वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शिवाजीराव धर्माधिकारी, विजय रणखांब, एकनाथ मामडे यांनी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देऊन विचार मांडले. वर्धापन दिनाच्या निमित्ताने खंडेराया संगीत मंच नांदेड यांचा सांस्कृतिक बहारदार कार्यक्रम झाला. कामगार कल्याण मंडळाचे वतीने सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. होते.या कार्यक्रमात कामगार कल्याण मंडळ कार्यालयातील सर्व गटातील अधिकारी कर्मचारी कामगार व पाल्य उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार विलास मेंडके यांनी केले.