
नागरिकांत होतो हाहाकार..!!
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी उमापूर कृष्णा जाधव
गेवराईउमापूर मधील उमापूर फाटा
येथील रस्त्यावर घरा लगत एक फुटाच्या अंतरावर दोन डी.पी असून
डीपीच्या एक फूट अंतरावर दुकाने, पान स्टॉल आहेत.
थोडे पाऊस झाले असता या डीपीच्या तारांना व खालच्या अर्थिंग तारांना पूर्णपणे करंट सुटत असून
काही दिवसापूर्वी या शेजारच्या पूर्ण दुकानांना सप्लाय सुरू झाला होता.
व काही वेळातच महावितरण कार्यालयाला फोन करून हि डी.पी बंद करण्यात आली होती.
व पाऊस गेल्यानंतर विष पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला असून
ही डीपी पुन्हा नागरिकांसाठी धोकादायकच आहे.
डीपीच्या एक फूट अंतरावर राहते घर असून या घरात तीन ते चार लहान मुले ही आहेत व ते खेळण्यासाठी या डीपीच्या आवारात येत असून आशा डीपीच्या निष्काळजीपणाने एखाद्याचा बळी जाऊ शकतो.अशी शंका ही नाकारता येत नाही.रोड लगत ही डीपी असून
या डी.पी मुळे मोठी मानहानी ही होऊ शकते.
सदरील डीपी ही दुसऱ्या जागेवर हलवण्याची मागणी येथील रहिवासी व जनतेतून होत आहे, महावितर नाणे याकडे लक्ष देणे गरजेचे ठरले आहे.भर रस्त्यात आणि वस्तीत ही डीपी अशी उघडी आहे याचे काही वायर खाली डोंबले असून कधीही स्पार्किंग होते.व या डीपीतून कधीही स्पोट व सारखे जाळ होतात.
ही डी.पी इथून दुसऱ्या जागेत
हलवण्यात यावी अशी येथील जनतेची मागणी आहे.या डी.पी.च्या भोवती सर्व मार्केटिंग दुकाने हॉटेल्स असा एरिया असून.येथे पूर्ण वाहने पार्किंग केली जात असून व
सारखे येथे पूर्ण पब्लिक थांबून राहते बसची वाट पाहण्यासाठी ही यापुढेच थांबावे लागते…