
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नादेड (देगलूर): देगलूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी एक हात मदतीचा उपक्रम देगलूर शहरात सुरू करण्यात आला. त्यावेळी देगलूर शहरातील एस. एम. जोशी सभागृहाशेजारी रोडलगत उघड्यावर पाल टाकून हलाखीचे जीवन जगत असलेल्या एका भटक्या जमातीतील कुटुंबाची तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांना मायेचा आधार देत रेशन कार्डसहित विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला. या कुटुंबासाठी तहसीलदार देवदूत बनल्याची चर्चा होत होती.
आदिवासींपेक्षाही हलाखीचे जीवन जगणारे भटक्या जमातीतील एक कुटुंब मागील अनेक दिवसांपासून तहसील कार्यालयाच्या समोरील बाजूस असलेल्या एस.एम. जोशी सभागृहाशेजारी पाल टाकून उघड्यावरआपले जीवन जगत असतानाचे चित्र तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्या दुष्टीस पडले. त्यांनी या कुटुंबातीलव्यक्तींना आपल्या कार्यालयात बोलावून घेत त्यांची विचारपूस करीत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. . . सर्व योजनांचा लाभ देणार
या कुटुंबातील व्यक्तींना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगत त्यांच्या दोन मुलांना
शाळेत पाठविण्याची व्यवस्थाही केली.
विशेष म्हणजे तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी या कुटुंबातील व्यक्तींना प्रत्यक्ष आपल्या कार्यालयात बोलावून घेतले.
संध्याकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत ते स्वतः कार्यालयात उपस्थित राहून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना मदतीचा हात पुढे केला. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे सदरील कुटुंबाच्या चेहयावर मात्र आनंद दिसून आला. असेच देगलूर शहरातील प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यांनी व नगरपालिकेने भटक्या व गरजू जनतेसाठी एक हात मदतीचा उपक्रम राबवून देगलूर पॅटर्न महाराष्ट्रात निर्माण केला पाहिजे.