——————————————— आज जागतिक योग दिनामुळे सर्व शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थी घोषणा देत होते. निरोगी तन आणि शांत मनाची गुरुकिल्ली म्हणजे योग. नियमित करा योग,आयुष्यभर दूर ठेवा रोग. योग आहे आरोग्याची क्रांती, तुमच्या आयुष्यात आणेल सुख आणि शांती. यामुळे सर्वत्र योगमय वातावरण तयार झाले. 21 जून म्हणजे प्रकाश, स्पष्टता आणि प्रबोधन यांचा त्रिवेणी संगम होय. ध्यान हा योगाचा अविभाज्य भाग आहे. योग म्हणजे व्यायाम नाही तर स्वतःशी जगाशी आणि निसर्गशी एकरुपतेची भावना शोधणे होय.आरोग्य ही सर्वात मोठी भेट आहे. समाधान सर्वात मोठी संपत्ती असून ते केवळ योगानेच मिळते. योगासने करण्यासाठी प्रांत: काल महत्त्वाचा असतो. अनशा पोटी योग करणे अतिशय चांगले असते. योग करताना सैल कपडे घालावेत. स्त्रियांनी योग करण्यास काहीच हरकत नाही. असे वेगवेगळ्या ठिकाणी माहिती दिली जात होती.लोकांमध्ये योग दिनाबद्दल जागृती पसरण्यासाठी हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे.
आज धकाधकीच्या जीवनामध्ये कोणालाच स्वतःसाठी वेळ देता येत नाही, जो तो सारखा पळत आहे . त्यामुळे ब-याच जणांचे शरीर तंदुरुस्त राहिले नाही. बैठे काम केल्यामुळे पोट पुढे आले आहे. तसेच खाली मान घालून मोबाईलवर जास्त वेळ दिल्यामुळे सुद्धा अनेक जण दुर्धर व्याधींनी ग्रस्त झाले आहेत.त्यामुळे योग करणे आज सर्वांसाठी अतिशय किफायतशीर व उपयुक्त आहे. त्यासाठीच हा लेखन प्रपंच…..
सांघिक खेळामुळे नेतृत्वगुणाचा विकास होतो.खेळामुळे मनोधैर्य वाढते सर्वांशी आपलेपणा येतो.असे आपण म्हणतो. सध्या खेळासाठी शाळेला मैदाने अतिशय कमी झालेली आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे शरीर सुडौल बनत आहेत.आणि विद्यार्थी आळशी, कंटाळ खोर होत चालले आहेत.घरामध्ये बसून कॅरम बोर्ड वर वेळ घालत आहेत. आळस हा माणसाचा शत्रू आहे, अशी आळशी बालके देशाचं संरक्षण करणार काय? मिल्खा सिंगा सारखे धावणार काय ❓
त्यामुळे योग करून आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगासनाची आज सर्वांनाच गरज आहे. त्यासाठी योग करा आणि निरोगी रहा. हा संदेश या लेखातून सर्वाना द्यावयाचा आहे.
योग हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज् या शब्दापासून बनलेला आहे.ज्याचा अर्थ आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे.योगामध्ये ज्ञानयोग,भक्तियोग, कर्मयोग,राजयोग आहेत, ज्यांची आठ अंगामध्ये विभागणी केलेली आहे. त्यालाच अष्टांग योग म्हणतात. महाभारतात आणि भगवद्गीतेच्या फार पूर्वी 20 पेक्षा जास्त उपनिषेदामध्ये सर्वोच्च चेतनेसोबत मनाचे मिलन होणे म्हणजे योग होय.महर्षी पतंजली यांनी योग सूत्राची संपूर्ण माहिती सांगितली आहे. जैन धर्मातील पाच प्रतिज्ञा आणि बौद्ध धर्मातील योगाचाराची बीजे पतंजली योगसूत्रामध्ये आहेत. योगात अष्टांग मार्ग सांगितलेले आहेत. यम,नियमन आसन,प्रणायाम, प्रत्याहार हे बहिरंग आहेत.तर ध्यान, धारणा आणि समाधी हे अंतरंग म्हणून ओळखले जातात. योग म्हणजे बुद्धी,मन,भावना आणि संकल्प यांचे नियमन होय.त्यासाठी योग व्यक्तीला अतिशय महत्त्वाचा आहे आत्मशक्ती,विश्रांती,तृप्त झोप,पूर्ण अनुभवजन्य विश्वास याची जननी म्हणजेच योग होय. असे योगशास्त्रात सांगितले जाते. योग केल्याने मन शांत राहते, डोक्यातील त्रास देणारे विचार कमी होतात, साधुसंत,महंत,पंत यांना ज्या रिध्दीसिद्धी प्राप्त झालेल्या आहेत. त्या फक्त योगामुळेच आहेत.असे म्हटले जाते. भारतीय संस्कृतीत ऋग्वेदात योगाचा उल्लेख आलेला आहे.योग हे शास्त्र आहे. शरीर मन आणि आत्मा एकत्रित रित्या संतुलन साधण्याचे निरोगी आणि प्रसन्न ठेवण्याचे कार्य करते.योग ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे. योग साधना केल्याने मन तंदुरुस्त राहते.आसने, प्रणायाम आणि ध्यानधारणा या गोष्टी उत्तम आरोग्य राखायला उपयोगी पडतात. सूर्यनमस्कार.कपालभारती या योगिक क्रियांनी मनुष्याचे वजन कमी होण्यास मदत होते त्यामुळे 27 सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मान्यता दिली. त्यामुळे हा दिन जगभर साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान मा. नरेंद्र दामोदर मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 पासून 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून घोषित केले, तो प्रत्यक्ष 21 जून 2015 पासून साजरा केला जात आहे.193 देशापैकी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यादीतील 175 देशांनी या प्रस्तावाला तात्काळ मान्यता दिली.स्वतः पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीं यांनी भारताची राजधानी दिल्ली येथे राजपथावरील कार्यक्रमात सहभागी होऊन योगासने केले. त्यामुळे हा दिन आपण संपूर्ण जगभर शाळा महाविद्यालया तून तसेच वेगवेगळ्या प्रतिष्ठानकडून सर्व शासकीय निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व कार्यालयात साजरा करत आहेत. *स्वतःला बदला, जग बदलेल. प्रत्येक दिवशी योग,आनंददायी
ठरेल !* निरोगी आयुष्यासाठी योगासने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात .त्यामुळे मधुमेह, बद्धकाष्टता यासारखे आजार कमी होताना दिसतात. योग हा स्नायूसाठी अतिशय चांगला व्यायाम आहे. तसेच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या वरदान आहे. मनावरील ताण कमी होण्यासाठी योग अतिशय हितकारक आहे.पचन क्रिया ही चांगली होते. मन निरोगी राहते.अनेक आजारापासून मानवाला मुक्ती मिळते. त्यामुळे तो ताजातवाना दिसतो.योगाद्वारे शरीरातील चरबी कमी होते.नेहमी योग केल्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहते व खराब कोलेस्ट्रॉल ही कमी होतात.
स्नायू मजबूत होऊन शरीर तंदुरुस्त होते. म्हणूनच योगाला जगातील 175 देशांनी मान्यता दिली आहे.जगातील सर्व देशातील लोकांनी आपआपल्या तील सर्व मतभेद,भेदाभेद, उच्चनीचिता बाजूला सारून आपण सर्वजण एक आहोत या उद्देशाने सामूहिक रित्या 21 जून योग दिन साजरा करावा हाच मुख्य हेतू या मागचा आहे. म्हणून सन 2015 ला योगा फाॅर हार्मनी अॅड पीस, 2016 मध्ये कनेक्ट द युथ , 2017 मध्ये आरोग्यासाठी योग,2018 – शांतते साठी योग 2019- हृदयासाठी योग, 2020 -कौटुंबिक योग 2021- कल्याणकारी योग, 2022 मानवतेसाठी योग 2023 वसुधैव कुंटूबकम् आणि 2024 मध्ये महिला सशक्तीकरण असे दरवर्षी वेगवेगळ्या थीम्स वापरून योग दिन अतिशय आनंदाने जगभर साजरा केला जात आहे. योगाभ्यासावरील अनेक ग्रंथ सर्वत्र उपलब्ध झालेले आहेत. त्याचे वाचन करून योगाची शास्त्रशुद्ध माहिती आपण करून घ्यावी. सध्याची पिढी सुडौल होत आहे. व्यायाम हा प्रकार अतिशय कमी झाला आहे
.त्यामुळे विद्यार्थी स्थूल होत आहेत. त्यासाठी योग ही या काळात संजीवनी ठरणारी बाब आहे. म्हणून *योग करा, निरोगी रहा* अनेक योग गुरु आहेत ते योगाच्या माध्यमातून अनेक लोकांना योगाचे धडे देऊन त्यांना आजारा पासून दूर ठेवत आहेत. दररोज सकाळी सकाळी उठून योगासने केल्यास शरीराला ताण मिळून शरीरात असणारे छोटे मोठे सर्व आजार, रोग नाहीसे होतात. त्यासाठी ताडासन, कोणासन, सुखासन, वज्रासन,अधोमुख श्वानासन, मंडूकासन,भुजंगासन,पाद हस्तासन असे वेगवेगळे प्रकार केल्यास शरीर सुदृढ व निरोगी राहते. वरील सर्व आसने शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यास प्रतिकारशक्ती वाढते. मानसिक त्रासापासून सुटका मिळते. चिडचिडेपणा होत नाही. वयापेक्षा अधिक तरुण दिसण्यासाठी ही योग फायदेशीर आहे. चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात.अनिद्रा होत नाही .म्हणून जास्तीत जास्त आपण दररोज योगासने करावे. जसे सूर्य, चंद्र, तारे आपले नियोजित कार्य दररोज करतात,त्याच प्रमाणे योग आपण डोळ्यासमोर ठेवला तर जीवन हे आनंददायी व सुखकारक जगता येईल,तसेच 21 जून हा उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस आहे. या दिवसाला खगोलशास्त्रात समर साॅलस्टाईस (Summer solstice) असे म्हणतात.आज पासून दक्षिणायनाला प्रारंभ होतो.
21 जून हा दिवस सर्वात मोठा व रात्र लहान असणारा आहे. आज 13 तास 14 मिनिंटाचा दिवस व रात्र 10 तास 46 मिनिंटाची आहे .असे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. दा.कृ सोमण यांनी सांगितले आहे. जागतिक योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत*
अध्यक्ष: विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड
———————————————- आज जागतिक योग दिनामुळे सर्व शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थी घोषणा देत होते. निरोगी तन आणि शांत मनाची गुरुकिल्ली म्हणजे योग. नियमित करा योग,आयुष्यभर दूर ठेवा रोग. योग आहे आरोग्याची क्रांती, तुमच्या आयुष्यात आणेल सुख आणि शांती. यामुळे सर्वत्र योगमय वातावरण तयार झाले. 21 जून म्हणजे प्रकाश, स्पष्टता आणि प्रबोधन यांचा त्रिवेणी संगम होय. ध्यान हा योगाचा अविभाज्य भाग आहे. योग म्हणजे व्यायाम नाही तर स्वतःशी जगाशी आणि निसर्गशी एकरुपतेची भावना शोधणे होय.आरोग्य ही सर्वात मोठी भेट आहे. समाधान सर्वात मोठी संपत्ती असून ते केवळ योगानेच मिळते. योगासने करण्यासाठी प्रांत: काल महत्त्वाचा असतो. अनशा पोटी योग करणे अतिशय चांगले असते. योग करताना सैल कपडे घालावेत. स्त्रियांनी योग करण्यास काहीच हरकत नाही. असे वेगवेगळ्या ठिकाणी माहिती दिली जात होती.लोकांमध्ये योग दिनाबद्दल जागृती पसरण्यासाठी हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे.