दैनिक चालू वार्ता देगलूर
प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड ( देगलूर): देगलूर परिसरात सध्या खरीप पेरणीची लगबग सुरु आहे. खरीपात सोयाबीन पिकाची आधुनिक पद्धतीने टोकन मशीन द्वारे लागवड केली जात आहे. सोयाबीनच्या नवीन लागवड पध्दतीत एकरी दहा ते बारा किलो बियाणे लागत असतांनाच उत्पादन मात्र भरघोस होत असल्याचे सांगीतले जात आहे. यामुळे देगलूर परिसरात टोकण पध्दतीने सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसुन येत आहे.
देगलूर परिसरात पुवी सायोबीनची बैल अथवा ट्रक्टरव्दारे पेरणी केली जात होती. या पध्दतीमधे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचा खर्च एकरी एक हजार तर तीन ते चार हजाराचे बियाणे लागत होते. पेरणी केलेल्या बियाणाचे उत्पादन दहा ते बारा क्विंटल होत होते. मात्र टोकण पध्दतीने लागवड करण्याच्या पध्दतीत शेतकऱ्यांना एका एकरला दहा ते बाराकिलोच सोयाबीनचे बियाणे लागते. लागवडीचा खर्चही एकरी आठशे रुपये लागतो. पाणी कमी असल्यास लागवड केलेल्या सोयाबीनला शेतकऱ्यांना ठिबक सिंचनने पाणी देता येत असल्याने पाण्याचीही बचत होते. त्यामुळे देगलूर परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोकन मशीन चा वापर करून सोयाबीन पिकाची लागवड सुरु केल्याचे पहावयास मिळत आहे.
गेल्या आठवड्यात देगलूर परिसरात जोरदार पाऊस पडल्याने जवळपास पंधरा ते वीस हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी टोकन पद्धतीचा वापर करून सोयाबीनची लागवड केली. टोकन मशीनसाठी लागवडीच्या खर्च एकरी आठशे रुपये येत आहे. टोकन पध्दतीने लागवड करणाऱ्या सोयाबीन उत्पादकांना रब्बी हंगामात पावसाने उघडीप दिल्यास पिकांना पाणी देण्यासाठी सोयीचे होणार आहे.
(आंतरपीक लागवड)
हवामान विभागाने चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली
आहे. त्यामुळे परिसरतील शेतकऱ्यांनी , सोयाबीन, कापूस पीक पेरणी व लागवडीसइ प्राधान्य दिले आहे. देगलूर परिसरात काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पेरणी पध्दतीने तर काही शेतकऱ्यांनी अधुनिक लागवड पध्दतीने सायाबीनची पेरीण व लागवड केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी तूर व इतर पिकात आंतरपीक म्हणून सोयाबीनची लावणी केली आहे.