
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
कंधार येथील विश्रामगृहामध्ये तीन जुलैला आगामी विधानसभा निवडणूक अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कंधार तालुकाध्यक्ष परमेश्वर जाधव यांनी बैठक घेण्यात आली यामध्ये आगामी विधानसभेच्या अनुषंगाने विविध विषयावर, तालुक्यातील बारूळ मानारचे पाणी योजना तसेच निष्ठावंत शिवसैनिकांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी लोहा-कंधार मतदारसंघांमध्ये निष्ठावंत व योग्य उमेदवार द्यावा यासाठी लवकरच पक्षप्रमुखाची भेट घेण्याचे ठरले आहे.
तालुक्यातील मनार प्रकल्प बारूळ येथून उदगीर व जळकोट तालुक्यातील २२० गावाला जाणारे पाणी योजना ही कंधार तालुक्याला वाळवंटात रूपांतर करणार आहे याचा विरोध म्हणून शिवसेनेमार्फत मोठे जनआंदोलन करणार असल्याचे ठरले. आज घडीला मतदार संघात कोणताही उमेदवार निश्चित केलेला नसून उद्धवजी ठाकरे जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्यासाठी जुन्या आणि नवीन शिवसैनिकाने कामाला लागावे असे माजी आमदार, लातूर जिल्हा संपर्क प्रमुख रोहिदास चव्हाण म्हणाले.
मनार प्रकल्प बारूळ येथून जाणाऱ्या पाणी योजनेला शिवसेने विरोध करूनही पुन्हा पाणी नेण्यासाठी काम सुरू करण्यात असून त्याचा परिणामाचे गांभीर्य आपल्या प्रास्ताविकेतून तालुकाध्यक्ष परमेश्वर जाधव यांनी मांडताना दिसून आले.
यावेळी या बैठकीला माजी आमदार लातूर जिल्हा संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण, भालचंद्र नाईक उपजिल्हा प्रमुख, सभापती सतीश उमरेकर, शहर प्रमुख अतुल पापीनवार, माजी सभापती तालुका संघटक पंडित देवकांबळे,पं स सदस्य तालुका समन्वयक उत्तम चव्हाण, माजी सभापती माणिक चोपवाड, उपजिल्हाप्रमुख बाबुराव पाटील शिंदे यांच्यासह ज्येष्ठ व युवा शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्ताविक तालुकाध्यक्ष परमेश्वर जाधव यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार उत्तम चव्हाण, पंडित देव कांबळे यांनी मांडले.
(शिवसेना संपर्क प्रमुख मा. बबनराव थोरात यांच्या आदेशाने आणि जिल्हाप्रमुख माधव पावडे यांच्या सूचनेनुसार निष्ठावंत शिवसैनिकास नियुक्तीपत्र देण्यात आले.)
दादाराव पा. शिंदे, शिवाजी पा.कदम , विश्वनाथ पवार, संभाजी पा कदम, राहुल पा शिंदे, रोहिदास शिराढोणे, संतोष पा घोरबांड, आत्माराम पा लाडेकर, राजीव पा डफडे, जि एम पवळे, रमाकांत देवने, मोहन हराळे, लक्ष्मण कटवाड, भगवान कुंजरवाड यांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी निरंजन वाघमारे, शरद बिजलगावे, संतोष जोतकर,ओम बंडेवाड, गजानन सुकणे, संदीप गायकवाड, विजय मोरे, बालाजी डांगे, सुधाकर पवार, शंकरराव चिवळे, बालाजी बसवदे, अलीभाई शेख, संपतराव पाटील बामनीकर, व्यंकटराव मोरे, वसंत निलावाड, बालाप्रसाद मानसपुरे, विश्वनाथ बामनवाड, रामराव मोरे, भीमराव शिंदे, बालाजी गाडेकर, बालाजी जाधव, रमेश डोळेवार, बालाजी कदम, दिगंबर शिंदे, बालाजी मोरे, लक्ष्मण गायकवाड, जगन्नाथ जाधव, महेंद्र तेलंग यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.