
दैनिक चालू वार्ता देगलूर
प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर): दिनांक ५ जुलै 2024 रोजी मुंबई येथे पावसाळी अधिवेशनामध्ये देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा देण्यात यावा असा विधिमंडळात प्रश्न लावून धरला देगलर बिलोली मतदारसंघात सन २०२३-२४ ढगफुटी व अतिवृष्टी झाली होती आमदारांनी स्वता पाहणी करुन शासनाकडे पाठपुरावा करून विनंती केली होती.
पण अद्यापही देगलूर बिलोली मतदारसंघातील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. पिक विमा कंपन्यांनी पंचनामे करून ही त्यांची अजुनही कसली मदत शेतकर्यांना मिळवून दिली नाही. यासाठी अध्यक्ष साहेबांनी लवकरात लवकर पिक विमा कंपनीला आदेश काढून शेतकऱ्यांना पिक विमा द्यावा. असे विधिमंडळात आमदार जितेश अंतापूरकर यांनी प्रश्न निर्माण केला.तसेच शेतकर्यांना शेतीच्या पाण्यासाठी लागणारे विजबील खुप येत असून
शासनाने फक्त५ ए.च पी मोटारचे बील माफ केले असून हे शेतकर्यांना फारसे उपयोग होत नाहि कारण शेतकरी हे १० एच.पी मोटारची विजबिल माफ करावे अशीही मागणी अधिवेशनात आमदार जितेशभाऊ अंतापूरकर यांनी मांडले.