
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड ( देगलुर ):
दिनांक 2. जुलै 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगलुर येथील शिक्षक चार वाजून पंधरा मिनिटानंतर शाळा बंद करून घरी गेले असता ठीक संध्याकाळी सुमारे सात- साडेसात वाजता काही अज्ञात चोरांनी शाळेवर चढून ज्या वर्गात शालेय पोषण आहार ठेवला आहे त्या वर्गाचा कुलूप तोडून चोरांनी संपूर्ण माल लंपास करण्याची तयारी केली होती पण तेथील काही सज्ञान नागरिकांनी येथील मुख्याध्यापक ए. बी .चिद्रावार यांना दूरध्वनीवर संपर्क साधून शाळेतील माल चोरीस जात आहे असे सांगीतले लागलीच येथील मुख्याध्यापक चिद्रावार सरांनी पोलीस निरीक्षक नरहरी त्र्यंबक फड यना दूरध्वनीवर संपर्क साधून आमच्या शाळेतील तांदुळ चोरीस जात आहे आम्हास सहकार्य करा असे कळवले . काही मिनिटातच कर्तव्यावर असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी आदरणीय पोलीस निरीक्षक फड हे शाळेत पोहोचले. चोरांना पोलीसांचा सुगावा लागतात चोरांनी पोषण आहार शाळेतच ठेवून पळ काढला अन््चोराच्या तावडीतील माल बाल बाल वाचले यामुळे येथील मुख्याध्यापक अविनाश चिद्रावार व सहशिक्षक चंद्रकांत मारकवाड सर यांनी शाल पुष्पहार देऊन फड यांचे अभिनंदन केले .व असेच सहकार्य आमच्या जिल्हा परिषद शाळेस कराल अशी सदिच्छा यावेळी व्यक्त केले.