
पाच हजार हिंदू बांधव रस्त्यावर
धर्माबाद शहर कडकडीत बंद
36 समाज संघटनांनी दिला विराट मोर्चाला एक मुखाने पाठिंबा
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड ( देगलूर):धर्माबाद तालुक्यात पहिल्यांदाच ऐतिहासिक असा वीरशैव लिंगायत समाज व सकल हिंदू समाजाच्या वतीने खोटे गुन्हे दाखल केल्याच्या संदर्भात आमदार राजेश पवार यांच्या विरोधात भव्य दिव्य हजारो तरुणांनी धर्माबाद शहर कडकडीत बंद करून आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले .
आमदार राजेश पवार यांच्या धर्माबाद येथे झालेल्या आमसभेच्या दिवशी मनसेच्या वतीने सार्वजनिक हिताची मागणी करणारे बॅनर प्रदर्शित केले होते त्या कारणावरून भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी मनसेचे शहराध्यक्ष सचीन रेड्डी व बॅनर प्रिंटिंगचा व्यवसाय करणाऱ्या हनुमंत कत्ते वर खोटे गुन्हे दाखल केले होते त्याच्या निषेधार्थ आज धर्मवाद शहरांमध्ये सकल वीरशैव लिंगायत समाज व सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य दर्शन करण्यात आले
आमदार राजेश पवार यांच्या एकाधिकारशाही व हुकूमशाहीने धर्माबाद शहर त्रस्त झाले असून मतदारसंघातील जनता सुद्धा व्यतीत झालेले असल्याची भावना या जन आक्रोश मोर्चातून जनतेने व्यक्त केली खोटे गुन्हे मागे घ्या
हुकूमशाही बंद करा
तानाशाही बंद करा राजेश पवार मुर्दाबाद अशा घोषणा देत जवळपास पाच हजार बांधवांनी धर्माबाद च्या मुख्य रस्त्याने घोषणा देऊन आमदार राजेश पवारांचा व प्रशासनाचा निषेध केला
अत्यंत शांत आणि संयमाने निघालेल्या या मोर्चातून जनतेचा आक्रोश सिद्ध होत होता अत्यंत छोटे असलेल्या विषयाला हवा देऊन राजकारणाने प्रेरित होऊन हे गुन्हे दाखल केले त्यामुळे जनतेचा हा आक्रोश स्पष्ट दिसून येत होता. धर्माबाद तालुक्यातील सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध झाला विशेष म्हणजे या मोर्चाला धर्माबाद तालुक्यातील 36 समाज संघटनेने पहिल्यांदाच लेखी पाठिंबा.
प्रशासनाला पत्र देऊन कळविला होता ही या मोर्चाची मोठी उपलब्धी होती. यावरून असे सिद्ध होत आहे की धर्माबाद तालुक्यात आमदार राजेश पवार यांच्या कार्यप्रणालीवर अत्यंत असंतोष निर्माण होत असून येणाऱ्या आगामी काळात मात्र ही निवडणूक राजेश पवारांसाठी जड जाणार आहे
याही अगोदर लिंगायत समाजातील चार तरुणावर त्यांच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले
तहसील प्रशासनाला निवेदन देत असताना अनेक मान्यवरांची या ठिकाणी भाषणे झाली
ज्यामध्ये प्रत्येकाने आमदार राजेश पवार यांच्या एकाधिकारशाहीचा पाढा वाचला या कार्यक्रमाला वीरशैव लिंगायत समाजाचे नेते बजरंग दल विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि धर्माबाद तालुक्यातील जवळपास 36 समाज संघटनेच्या प्रतिनिधी यावेळी या आक्रोश मोर्चात प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवून निषेध नोंदवला. धर्माबाद शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आपली उत्स्फूर्तपणाने प्रतिष्ठान बंद ठेवून सचिन रेडी व हनुमंत कते या दोन निष्पाप तरुणावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सहकार्य केले
अत्यंत शांततेने हा मोर्चा तहसीलदार व पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन शांततेच्या मार्गाने संपला
राष्ट्रगीताची सुरुवात करून ह्या मोर्चाची सुरुवात महात्मा बसवण्णा हिल्स येथून झाली होती
शांतता संयम याचा सुरेख असा संगम या मोर्चा दिसून आल्या समाजाच्या भावना तीव्र असताना सुद्धा अत्यंत लोकशाही पद्धतीने यांनी मोर्चा निघाला व व्यापाऱ्याने त्याला भरभरून प्रतिसाद दिला
वातावरण शांततामय तणावपूर्ण होते परंतु मोर्चाची सांगताही अत्यंत चांगल्या पद्धतीने झाली.